शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

जनावरांच्या औषधांची अवैधरित्या विक्री

By admin | Updated: July 31, 2015 01:25 IST

तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे आंध्रप्रदेश राज्यातून जनावरांची औषधे खरेदी करुन ती तालुक्यात अनाधिकृतपणे विक्री केल्या जात आहे.

प्रशासनाकडे तक्रार : मात्र कारवाईत दिरंगाई, पत्रपरिषदेत आरोपगोंडपिपरी : तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथे आंध्रप्रदेश राज्यातून जनावरांची औषधे खरेदी करुन ती तालुक्यात अनाधिकृतपणे विक्री केल्या जात आहे. विशेष म्हणजे, याबाबतची तक्रार चंद्रपूर येथील अन्न, औषध प्रशासन विभागाकडे केली असता तब्बल सात दिवसांनी तक्रारीची दखल घेण्यात येऊन थातूर-मातूर कारवाई करण्यात आली. त्यामुळे हा प्रकार सुरूच असून औषधांची अवैध विक्री करणाऱ्यास अभय दिला जात असल्याचा आरोप भंगाराम तळोधी मारोती येग्गेवार यांनी पत्रपरिषदेतून केला आहे. तालुक्यातील मौजा भंगाराम तळोधी येथील मारोती अम्मावार नामक इसम गेल्या दोन ते तीन वर्षापासून आंध्रप्रदेश राज्यासह नजीकच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी व अन्य तालुक्याच्या पशुधन अधिकाऱ्यांकडून कमी दरात जनावरांचा औषधीसाठा आणून गावात अधिक भावाने विक्री करीत आहे. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याने याबाबत एका नागरिकाने २२ जुलै रोजी चंद्रपूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तक्रार केली. मात्र संबंधित विभागाने सदर तक्रारीची उशिरा दखल घेतली. २७ जुलै रोजी विभागाचे निरीक्षक ग. क्र. नांदेकर यांनी भंगाराम तळोधी येथे भेट देऊन अनाधिकृतपणे औषधे विक्री करण्याचा आरोप असलेल्या मारोती अम्मावार यांच्या घरी धाड टाकली. काही औषधींची चाचपणी केली. मात्र सदर कारवाई करताना तक्रारीनंतर आठवडाभराहून अधिक कालावधी लोटल्याने औषध विक्री करणाऱ्याने जवळच्या साठयाची विल्हेवाट लावली. नंतर फक्त शेळी मेंढी पालनचा आपला व्यवसाय असल्याचे सांगून अशी अवैध विक्री करीत नसल्याचे सांगितले. तत्पूर्वी याच इसमाकडून मागील एक ते दोन वर्षापूर्वी भं. तळोधी येथीलच काही शेळ्या मेंढ्या पालनकर्त्या व्यवसायीकांनी औषधी खरेदी करुन जनावरांना दिल्याने शेकडो शेळ्यांना मृत्यूमुखी पडावे लागल्याची माहितीदेखील पत्रपरिषदेत देण्यात आली. अन्न, औषध विभागाच्या निरीक्षक जी. के. नांदेकर यांनी हेतुपूरस्सरपणे संबंधितांवर कारवाई टाळण्यासाठी दिरंगाई करुन उलट तक्रारकर्ता व एका मेडीकल स्टोअर्सच्या मालकाला नाहक धारेवर धरत अवैध औषध विक्रेत्याला अभय दिल्याचा आरोप तंमुस अध्यक्ष संजय रामगोनवार यांनी केला आहे. तक्रार प्राप्तीनंतर संबंधित ठिकाणी भेट देऊन थातूर-मातूर पंचनामा करीत अवैध औषध विक्रेत्याची पाठराखण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. (तालुका प्रतिनिधी)