शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
आजचे राशीभविष्य, ३० ऑगस्ट २०२५: कौटुंबिक वातावरण आनंदी असेल, वाणीवर संयम ठेवावा !
3
...आणि पोलिसांचा थेट जरांगे यांना व्हिडीओ कॉल!
4
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
5
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
6
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
7
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
8
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
9
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
10
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
11
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
12
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
13
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
14
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
15
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
16
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
17
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
18
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
19
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
20
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम

भद्रावती शहरात दारूची अवैध विक्री

By admin | Updated: June 20, 2015 01:57 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होवून दोन महिने झाले. मात्र भद्रावती शहरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री जोमाने सुरु आहे.

पोलिसांचे दुर्लक्ष : प्रतिष्ठित नागरिकाकडून तस्करीभद्रावती: चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होवून दोन महिने झाले. मात्र भद्रावती शहरात ठिकठिकाणी अवैध दारू विक्री जोमाने सुरु आहे. येथील विजासन रस्त्यावरील एका बियर बारमध्ये सर्रास दारूचा व्यवसाय सुरू असून येथीलच एक प्रतिष्ठित नागरिक वणीवरून दारू आणून येथील अवैध दारू विक्रेत्यांना ती पुरविण्याचे काम करीत असल्याची बाब समोर आली आहे.१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर संपूर्ण जिल्हाच दारूमुक्त होणार अशी अपेक्षा व्यक्त होत असताना नागरिकांची निराशा होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. पोलिसांनी सुरुवातीला एक महिन्याच्या कार्यकाळात विविध ठिकाणी अवैध दारू अड्डयांवर धाडी टाकून गुन्ह्याची शंभरी पार करुन १२० आरोपींना ताब्यात घेतले. मात्र आता १५ दिवसांचा कार्यकाळ पाहता मोठा साठा जप्त न करता थातूरमातूर कारवाई करुन पोलीस अट्टल दारू विक्रेत्याला मुभा देत असल्याची चर्चा आहे. येथील विजासन रस्त्यावरील बिअरबारमधून दारूची धडाक्याने विक्री सुरू आहे. शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्ती एका सहकाऱ्याच्या माध्यमातून मद्यपींना मोठ्या प्रमाणावर दारूचा पुरवठा करीत आहे. हा प्रकार सकाळी ११ वाजतापासून ते सायंकाळी १० वाजेपर्यंत सुरू राहत असल्याची माहिती येथीलच काही नागरिकांनी दिली. या बार मालकावर दोनदा अवैध दारू विक्री प्रकरणी कारवाई करण्यात आली असली तरी या पोलीस ठाण्यामध्ये नव्याने रुजू झालेल्या शिपायाचा मध्यस्तीने हा व्यवसाय चालत असल्याची चर्चा आहे.यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातून दारूचा साठा आणून भद्रावतीत पुरवठा करण्याचे काम येथीलच एक प्रतिष्ठित नागरिक एका महिन्यापासून करीत आहे. देशी-विदेशी दारूचा पुरवठा पेटीच्या हिशोबाने केला जात असून मद्यपींकडून मात्र तीनपट रक्कम घेतल्या जात आहे. पोलीस मात्र गावाबाहेरून होणाऱ्या दारू तस्करीवर थातूरमातूर कारवाई करुन आपला केलेली कारवाई योग्य असल्याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना भासवून येथील अट्टल दारू विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करीत आहे.दारूबंदी करणारे पुढारी गावागावात दारू बंदी समित्या नेमून संपूर्ण जिल्हा दारू मुक्त करु अशा घोषणा करीत होते. मात्र दारुबंदी होवून तीन महिने लोटत असताना सुद्धा गावात तर सोडाच परंतु शहरात तरी दारूबंदी समित्या नेमल्या गेल्या नसल्याने वर्धा- गडचिरोलीपेक्षा चंद्रपूर जिल्ह्यात जास्त प्रमाणातत अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरु आहे. (शहर प्रतिनिधी)गोवरी परिसरात दारूची अवैध विक्रीगोवरी:राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या गोवरी परिसरात दारूची अवैध तस्करी करुन छुप्या मार्गाने सुरू आहे. मद्यपी आपली हौस भागविण्यासाठी ठरवून दिलेल्या किंमतीपेक्षा दुप्पट पैसे देऊन दारू पित आहे. यातून दारू विक्रेता चौपट नफा कमवित असल्याने नीट उभा होत असलेला सुखी संसाराचा डोलारा पुन्हा कोसळायला सुरुवात होणार काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ही दारूची अवैध तस्करी नदीपट्ट्यातून सुरु असल्याने याकडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी होऊन अंमलबजावणी सुरुवात झाली. यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांच्यापासून सर्वसामान्य जनतेने दारूबंदीसाठी लढा उभारला. त्यातून यश पदरात पाडले. जिल्ह्याबाहेरुन दारूची तस्करी होऊ नये यासाठी राज्याच्या जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस तपासणी नाका उभारण्यात आला. मात्र दारूबंदीचा अवैध दारुविक्रेत्यांनी सुरुंग लावत पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी नदीपट्ट्यातून आडमार्गाने दारूतस्करी करण्याचा सपाटा सुरु केला आहे. कोरपना तालुक्यातील पैनगंगा नदीच्या विरुर (गाडे) घाटावरुन विक्रेते दारुची अवैध तस्करी करीत असल्याची खात्रीलायक माहिती आहे.