शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी उठताच अवैध दारू सम्राट ग्रामीण भागात सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 05:00 IST

तब्बल सहा वर्षे दारूबंदी कायम राहिली. या काळात नागपूर, पौनी, लाखांदूर, तसेच बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने दारू पुरवठा करण्यात येत होता.  अनेक तरुण, महिला युवक, शाळकरी मुले या व्यवसायात जास्त पैसा मिळवण्याच्या लालसेने आपसूकच ओढल्या गेली होती. यात काही मोजक्या लोकांनी या व्यवसायात रग्गड पैसा कमावला, तर काही मोजके ठोक अवैध दारूचा व्यवसाय करणारे म्हणून नावारूपास आले होते. दारूबंदी हटताच यातील काही दारूसम्राट आता नव्याने रिचार्ज झाले आहेत.

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मागील महिन्यात जिल्ह्यातील दारूबंदी हटविण्यात आली. परवाने नूतनीकरण करून अनेक बार व देशी भट्ट्या सुरू करण्यात आल्या. अवैध दारूचा व्यवसाय करणारे दारू सम्राट नव्याने रिचार्ज झाले असून, आता ते ग्रामीण भागात सक्रिय झाले आहेत. तालुक्यातील अनेक गावांत येथील एका भट्टीतून देशी दारूचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे दारूबंदीच्या काळात जेवढी दारू मिळत नव्हती, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात आता देशी दारू सहजपणे ग्रामीण भागात मिळत आहे.मागील तत्कालीन शासनाने २०१५ मध्ये दारूबंदीची घोषणा केली. तेव्हापासून तब्बल सहा वर्षे दारूबंदी कायम राहिली. या काळात नागपूर, पौनी, लाखांदूर, तसेच बाहेरील राज्यातून मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने दारू पुरवठा करण्यात येत होता.  अनेक तरुण, महिला युवक, शाळकरी मुले या व्यवसायात जास्त पैसा मिळवण्याच्या लालसेने आपसूकच ओढल्या गेली होती. यात काही मोजक्या लोकांनी या व्यवसायात रग्गड पैसा कमावला, तर काही मोजके ठोक अवैध दारूचा व्यवसाय करणारे म्हणून नावारूपास आले होते. दारूबंदी हटताच यातील काही दारूसम्राट आता नव्याने रिचार्ज झाले आहेत.     एका भट्टीतून देशी दारू मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचविली जात आहे. पुरवठा करणाऱ्या जवळपास वीस ते पंचवीस जणांचा ताफा दिमतीला असून, अहोरात्र दारूचा पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे संपूर्ण ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात देशी दारू मिळत आहे. खुलेआम हा दारूपुरवठा केला जात असला तरी याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर अनेक कारवाया करण्यात आल्या आहेत. नव्याने अवैध दारूचा प्रकार आढळून आल्यास पोलीस प्रशासनाकडून निश्चितपणे कारवाई करण्यात येईल. -रोशन यादव,  पोलीस निरीक्षक, ब्रह्मपुरी

 

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस