शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

गुजरातेतून जुनासुर्लात आणलेला पाच लाखांचा अवैध खतसाठा जप्त, एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 14:14 IST

कृषी विभागाची कारवाई : विनापरवाना सुरू होती विक्री

मूल (चंद्रपूर) : जुनासुर्ला येथे खताची अवैध साठवणूक करून विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरून कृषी विभागाने सोमवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास धाड टाकून तब्बल ५ लाख १९ हजारांचे खत जप्त केले. हे खत जेके फर्टीलायझर आनंद गुजरात या कारखान्यातून आणल्याची माहिती आहे. याप्रकरणी विक्रेत्याला अटक करण्यात आली. अमोल प्रल्हाद मडावी (३०) रा. पंचाळा, ता. राजुरा असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी अमोल मडावी हा मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथील वासुदेव समर्थ यांच्या घरी खताच्या ३४६ पोते साठवणूक करून शेतकऱ्यास विक्री करीत असल्याची गुप्त माहिती कृषी विभागाला मिळाली. त्यानंतर नागपूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक राजेंद्र साबळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, कृषी उपसंचालक चंद्रकांत ठाकरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी वीरेंद्र राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने व पोलिसांनी जुनासुर्ला येथे छापा टाकला असता घरात भूमीरस ऑरगॅनिक फर्टीलायझरचे ३४६ पोते आढळले. या खताची किंमत ५ लाख १९ हजार रुपये आहे. समर्थ यांनी हे खत कुणाचे याची माहिती दिल्याने याप्रकरणी आरोपी अमोल मडावी याला अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश १९८५ चे खंड ६ व खंड २२ जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ चे खंड ३ (२, अ,ब,क) आणि भादंवि कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला.

ही कारवाई मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी देव घुनावत, तालुका कृषी अधिकारी किशोर चौधरी, तालुका कृषी अधिकारी सुनील कारडवार, तालुका कृषी अधिकारी भास्कर गायकवाड, मोहीम अधिकारी लकेश कटरे, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक श्रावण बोडे, मूलचे ठाणेदार सुमित परतेकी, कृषी पर्यवेक्षक पंजाबराव राठोड, कृषी सहायक विनोद निमगडे यांनी केली.

दलालांचे धाबे दणाणले

शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत मनमानी दराने गावातच खत विक्री करणारे दलाल सक्रिय झाले आहे. मूल तालुक्यात मोठ्या प्रमाणात चोर बीटी बियाण्यांची विक्री जोरात आहे. या कारवाईने अवैध खत व बियाण्यांची विक्री करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहे. गतवर्षी असा प्रकार नव्हता. यंदा पहिल्यांदाच गावागावांत दलाल सक्रिय झाल्याने सामान्य शेतकरी त्यांच्या गळाला लागत आहेत.

कृषी विभागाच्या भरारी पथकाने ५ लाख १९ हजारांचा अवैध खतसाठा जप्त केला. विक्रेत्याकडे कोणतेही परवाने नव्हते. जप्त खताचा नमुना काढून परीक्षणासाठी अमरावती येथील खत नियंत्रण प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. नमुन्यांची तपासणी होऊन अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.

-किशोर चौधरी, तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती, मूल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूरFertilizerखतेArrestअटक