शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशानंतरही आदर्श शिक्षकांची उपेक्षाच; शासनाकडून वेतनवाढ अंमलबजावणीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 14:25 IST

आगाऊ वेतनवाढ दिलीच नाही : शिक्षकांमध्ये शासनाप्रति रोष

लोकमत न्यूज नेटवर्क सास्ती : जिल्हा परिषदेच्या वतीने ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी प्रत्येक तालुक्यातून एक आदर्श शिक्षकांना एक आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला होता. दरम्यान, २००६ पासून वेतनवाढ लागू नसलेल्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने ४ सप्टेंबर २०१८ पूर्वीच्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा आदेश दिला. मात्र, शासनाने अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे संबंधित आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांना न्यायासाठी जिल्हा परिषदेच्या चकरा माराव्या लागत असल्याचे दिसून येत आहे.

राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने १२ डिसेंबर २००० च्या परिपत्रकान्वये दरवर्षी ५ सप्टेंबरला जिल्हा परिषद शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्यानंतर एक आगाऊ वेतनवाढ मंजूर केली होती. परंतु २००० ते २००८ पर्यंतच्या शिक्षकांना २४ ऑगस्ट २०१७ च्या शासन निर्णयानुसार वेतनवाढ लागू नसल्याचे सांगन अनेकांकडन दिलेली वेतनवाढ १५ वर्षांनंतर वसूल केली जात आहे. ग्रामविकास विभागाच्या वतीने एक आगाऊ वेतनवाढ देण्यासंदर्भात १ जुलै २०२२ चे परिपत्रक निघाले. २००६ ते २००८ मधील शासकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कार्याबद्दल आगाऊ वेतनवाढीची रक्कम अदा करण्याबाबत १५ डिसेंबर २०२२चे परिपत्रक जारी केले. २४ ऑगस्ट २०१७ चा निर्णय कालबाह्य झाल्यानंतरही आदर्श शिक्षकांवर अन्याय केला जात आहे. 

जिल्हा परिषदेत चकरा २००६ पासून वेतनवाढ लागू नसलेल्या शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर ४ सप्टेंबर २०१८ पूर्वीच्या पुरस्कारप्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढ देण्याचा निर्णय दिला. त्यानुसार २५/४/२०२२ रोजीच्या परिपत्रकानुसार वेतनवाढ मंजूर झाली. परंतु, अजूनही शिक्षकांना ही वेतनवाढ देण्यात आली नाही. वेतनवाढीसाठी जिल्हा परिषदेच्या चकरा माराव्या लागत आहेत.

"मला २००८ मध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये एक आगाऊ वेतनवाढ मंजूर झाली. सेवानिवृत्त होऊन सात वर्षे झाले, मात्र वेतनवाढ व थकबाकीसाठी चकरा माराव्या लागत आहेत. निवृत्त शिक्षकांच्या विविध समस्या जिल्हा परिषद प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. या समस्या तातडीने निकाली काढाव्यात."- बाबूराव मुसळे, सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी

 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर