विकास आमटे : व्याघ्र संवर्धन रॅलीला केले मार्गदर्शनवरोरा: समाजाने बहिष्कृत केलेल्या मोजक्या व्यक्तींना सोबत कर्मयोगी बाबा आमटे यांनी आनंदवन सुरू केले. आज आनंदवनात कुष्ठरोगी, मूकबधीर अपंग मोठ्या प्रमाणात वास्तव्याला आहे. आनंदवनातील कार्य बघण्यासाठी भारतासोबतच विदेशातील नागरिक मोठ्या प्रमाणात येत आहे. आनंदवनातील प्रकल्पात काम करणाऱ्या समाजातील दुर्लक्षिताना जीवनाचा मार्ग आनंदवनात कर्मयोगी बाबा आमटे यांनी दिल्याने आनंदवनाची कीर्ती साता समुद्रापलीकडे गेली आहे, असे प्रतिपादन महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीला संबोधित करताना गुरूवारी आनंदवनात केले.वनविभागाच्यावतीने व्याघ्र संवर्धन जनाजागृती रॅली मुंबई ठाणे, मोहर्ली येथून गुरूवारी सकाळी आनंदवनात पोहचली. आनंदवनात कुणाचेही स्वागत केले जात नाही. कुणाचाही फोटो लावला जात नाही, कुष्ठरोगी, अंध, अपंग, कर्णबधीर असो, प्रत्येकाला आत्मनिर्भर होवून जगण्याचा मार्ग कर्मयोगी बाबांनी दिला. त्यामुळेच आनंदवनात मोठ्या संख्येने गुण्यागोविंदाने समाजातल बहिष्कृत घटक आनंदवनात राहत असल्याची माहिती डॉ. विकास आमटे यांनी दिली तर कर्मयोगी बाबा आमटे यांनी केलेल्या कार्याची विस्तृत माहिती डॉ. भारती आमटे यांनी दिली. व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीमध्ये सहभागी व्यक्तींनी आनंदवनातील विविध प्रकल्पला भेटी देवून माहिती जाणून घेतली. त्यानंतर रॅली यवतमाळ जिल्ह्यात मार्गक्रमण झाली. यावेळी महारोगी सेवा समिती आनंदवनाचे विश्वस्त सुधाकर कडू, वनविभागाचे एसीएफ राजीव पवार, विवेक मोरे, वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश तलांडे, भद्रावतीचे मुंडे, हिवरे तसेच इकोप्रोचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा वरोराच्यावतीने रॅलीचे स्वागत वरोरा येथील आनंदवन चौकात व्याघ्र संवर्धन जनजागृती रॅलीचे भाजपाच्यावतीने स्वागत करण्यात आले. यावेळी माजी पालक मंत्री संजय देवतळे, डॉ. भगवान गायकवाड, वरोरा तालुका भाजपा संघटक ओमप्रकाश मांडवकर, अॅड. मिलिंद देशपांडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
समाजातील दुर्लक्षितांना जीवनाचा मार्ग आनंदवनात गवसला
By admin | Updated: October 30, 2015 01:09 IST