शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

'ह्या' अटी पूर्ण न केल्यास, हजारो शिधापत्रिकाधारक अपात्र ठरण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 14:36 IST

Chandrapur : बारा वर्षांनंतरही उत्पन्न मर्यादेचा फेरविचार नाही

आशिष देरकरलोकमत न्यूज नेटवर्ककोरपना : राज्य शासनाच्या ४ एप्रिल २०२५ रोजीच्या निर्णयानुसार सध्या राज्यभर अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवली जात आहे. राज्यातील लाखो लाभार्थ्यांची पुन्हा एकदा पडताळणी सुरू आहे. मात्र २०१३ पासून उत्पन्न मर्यादा न बदलल्यामुळे तलाठ्यांकडून मर्यादित उत्पन्न दाखला मिळत नाही. त्यामुळे अनेक गरजूंवर अपात्रतेचे संकट निर्माण झाले आहे.

नवीन मोहिमेसाठी शासनाने १७जुलै २०१३ आणि १७ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयातील उत्पन्न मर्यादाच लागू ठेवली आहे. त्यानुसार निराधार आणि अंत्योदय लाभार्थ्यांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा २१ हजार रुपये आहे, तर प्राधान्य कुटुंबासाठी ती ४४ हजार रुपये आहे. जी शहरी भागासाठी ५९ हजार आहे. दरम्यानच्या १२ वर्षात देशात महागाई व नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र शासनाने त्या तुलनेत उत्पन्न मर्यादा वाढविलेली नाही.

ग्रामीण भागात शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यावसायिक व इतर व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे उत्पन्न वाढलेले असल्याने अनेक तलाठी ४४ हजार रुपयांपर्यंत कमी उत्पन्नाचे दाखले देण्यास नकार देत आहेत.

परिणामी लाभार्थ्यांना वारंवार तहसील कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. काही लाभार्थ्यांना ४५ ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न दाखले मिळाल्याने स्वस्त धान्य दुकानदार ते मान्य करत नाहीत आणि अशावेळी पुन्हा नवीन दाखला काढावा लागत आहे. एका दाखल्यासाठी सुमारे २०० रुपये खर्च येतो. जो गरीब लाभार्थ्यांवर आर्थिक बोजा निर्माण करणारा ठरतो. अपात्रतेच्या या मोहिमेमुळे गरजूंवर अन्याय होऊ नये यासाठी शासनाने तत्काळ लक्ष घालून योग्य ती सुधारणा करणे अत्यावश्यक आहे.

'लाडकी बहीण' साठी विसंगतीसर्वसामान्यांसाठी उत्पन्न मर्यादा २१ ते ४४ हजार ठेवली असताना 'लाडकी बहीण' योजनेसाठी मात्र अडीच लाख रुपये उत्पन्न मर्यादा ठेवण्यात आली आहे. या विसंगतीमुळे लोकांमध्ये रोष आहे. गत बारा वर्षांत एवढे काहीच बदलले नाही का, असा प्रश्न लाभार्थी करीत आहेत.

"तलाठी आणि तहसील कार्यालयांच्या कामकाजातील समन्वय अभाव, अपूर्ण माहिती आणि वेळोवेळी बदलणाऱ्या निर्देशांमुळे संभ्रम आहे. शासनाने त्वरित उत्पन्न मर्यादेचा फेरविचार करावा."- गरिबांचे नुकसान होत आहे. अशपाक शेख, लाभार्थी

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर