आता लक्षणे नसतील तर कोरोनाग्रस्ताला दहा दिवसात सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2020 05:00 AM2020-06-07T05:00:00+5:302020-06-07T05:00:50+5:30

भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली जायची.

If there are no symptoms now, the corona sufferer will be discharged in ten days | आता लक्षणे नसतील तर कोरोनाग्रस्ताला दहा दिवसात सुटी

आता लक्षणे नसतील तर कोरोनाग्रस्ताला दहा दिवसात सुटी

Next
ठळक मुद्देदुसऱ्यांदा चाचणी करण्याची गरज नाही । कोरोना रुग्णांना मोठा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रूग्णालयातून सुटी दिली जायची. आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. दहा दिवसात कोरोना संदर्भात लक्षणे आढळली नाहीत तर, रुग्णाला सुटी दिली जाईल. त्याची फेरतपासणी केली जाणार नाही. आरोग्य विभागाच्या या निर्णयाचा आधार घेत चंद्रपुरातील लक्षणे नसलेल्या रुग्णांना यापूर्वी सुटी देण्यात आली.
कोरोनाग्रस्त रुग्णामध्ये दहा दिवसात कुठलीही लक्षणे नसतील तर त्याची दुसरी चाचणी न करता थेट सुटी दिली जाणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या नव्या सूचनेनुसार याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे आता रुग्णालयात नव्या संशियातांसाठी जागा आणि चाचणीचा वेग वाढणार आहे.
भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित अथवा संशयित आढळला तर १४ दिवस त्याला रुग्णालयात ठेवले जायचे. त्यानंतर पुन्हा त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवायचे. तो अहवाल सलग दोनदा निगेटिव्ह आला तरच अशा रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली जायची.
आता हा कालावधी दहा दिवस केला आहे. दहा दिवसात कोरोना संदर्भात लक्षणे आढळली नाहीत तर, रुग्णाला सुटी दिली जाईल. त्याची फेरतपासणी केली जाणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार आता कोरोनाबाधित रुग्णांमध्ये लक्षणे नसतील तर त्याला दहा दिवसात कोणतीही चाचणी न करता सुटी देण्यात येते. सुटी दिलेला रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त असतो. त्यामुळे लोकांनी सुटी झालेल्या रुग्णांना घाबरू नये. मात्र समाजात वावरताना सामाजिक अंतर पाळावे, जंतुनाशकाने हात धुवावे.
-डॉ. कुणाल खेमनार,
जिल्हाधिकारी, चंद्रपूर.

सुटी झालेल्या रुग्णाकडून धोका नाही
रुग्णालयातून सुटी झालेला व्यक्ती दुसºयाला बाधित करू शकत नाही. मात्र, एखाद्या रुग्णाची प्रकृती स्थिर नसेल तर, त्याला सुटी द्यायची की नाही, याचा निर्णय वैद्यकीय अधिकारी घेणार आहेत. लक्षणे गंभीर असतील तर अशा रुग्णाला कितीही कालावधीपर्यंत म्हणजेच तो पूर्णपणे बरा होईपर्यंत रुग्णालयात ठेवले जाणार आहे.

Web Title: If there are no symptoms now, the corona sufferer will be discharged in ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.