शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

रेशन कार्ड हरवले, तर मिळणार ई-रेशन कार्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2024 12:28 IST

अडचण दूर होणार : ई-रेशनकार्डसाठी नवी प्रणाली जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : सरकारी स्वस्त धान्यासाठी तयार केलेले रेशन कार्ड हरवल्यास आता शासनाकडून ई- रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने एक नवी प्रणाली तयार केली. या प्रणालीचा वापर करून प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून ई- रेशन कार्ड तयार करता येते, अशी माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली.

केंद्र व राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या रेशन कार्ड योजनेचा फायदा कित्येक गरीब कुटुंबीयांना होत आहे. आता जुने रेशन कार्ड हरवल्यास त्या जागी ई- रेशन कार्ड सुरू करण्यात आले. त्यामुळे आता लाभार्थ्यांना ई- रेशन कार्डद्वारे धान्य खरेदी करता येणार आहे. ई- रेशन कार्डमुळे कार्डमधील नाव कमी करणे, नोंदवणे, ट्रान्सफर करणे, अशी कामे करण्यासही मदत होणार आहे. राज्यात ई- रेशन कार्ड प्रणाली सुरू करण्यात आली. पुढील काही महिन्यांत टप्प्याटप्प्याने सर्व रेशन कार्ड ई- कार्डमध्ये रूपांतरित करण्याची तयारी झाली. यासाठी संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली. पुरवठा विभागात प्रायोगिक स्तरावर या प्रणालीचा वापर सुरू झाला आहे.

ई- रेशन कार्ड कोणाला मिळणार? शिधापत्रिका हरवल्यास डुप्लिकेट शिधापत्रिका बनवण्यासाठी एक ऑनलाइन अर्ज भरावा लागेल. रेशन दुकान किंवा अन्न विभाग कार्यालय किंवा किओस्क सेंटरमधून अर्ज मिळेल. दिलेल्या लिंकवरून डुप्लिकेट रेशन कार्ड ऑनलाइन बनवण्यासाठी अर्ज डाउनलोड करू शकता. रेशन कार्ड डुप्लिकेट फॉर्म पीडीएफ हा फॉर्म फूड सेफ्टी पोर्टलवर मिळवू शकता. अर्ज प्राप्त केल्यानंतर, तो अर्ज काळजीपूर्वक भरा. रेशन कार्ड क्रमांक, शिधापत्रिकेत नोंद केलेले कुटुंबप्रमुखाचे नाव, वडील व आईचे नाव, मोबाइल नंबर इत्यादी माहिती काळजीपूर्वक भरावी.

३,५०,००० रेशन कार्डधारक जिल्ह्यात

  • चंद्रपूर जिल्ह्यात ३ लाख ५० हजार रेशन कार्डधारक आहेत. 
  • या कार्डधारकांना सरकारी धान्य दुकानातून नियमांनुसार धान्याचा लाभ दिला जातो.

रेशन कार्ड हरवले तर करा ऑनलाइन अर्ज यापूर्वी जुन्या रेशन कार्डबाबत अनेक तक्रारी निर्माण झाल्या होत्या. जुने रेशन कार्ड असल्यामुळे ते मळकट होणे, हरवणे, फाटणे, त्यावरील नावे पुसून जाणे, अशा कित्येक गोष्टी रेशनधारकांना अडचणीच्या ठरत होत्या. या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून तसेच सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने नोंद घ्यावी यासाठी ई-रेशन कार्ड प्रणाली सुरू झाली आहे. याचा फायदा नागरिकांना होणार आहे.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर