शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बाळाला जन्मजात कानाचा दोष असेल तर वेळीच कसे समजेल ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:54 IST

Chandrapur : ७० ते ८० डेसिबलपर्यंत आवाज प्रत्येक मनुष्य ऐकू शकतो.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही जणांच्या कानात जन्मजात समस्या असते ती वेळीच उपचार न केल्यास वाढते. लहान मुलांच्या कानांची अंतर्गत रचना अत्यंत छोटी व मुलायम असते, अशावेळेस थोडेजरी दुर्लक्ष झाल्यास कानाची समस्या वाढण्याचा धोका असतो, असा सल्ला कान, नाक, तज्ज्ञ डॉ. आशिष पोडे यांनी दिला आहे. काही मुलांमध्ये कमी ऐकू येण्याचा दोष जन्मजात किंवा आनुवंशिक असू शकतो. गर्भावस्थेत आईला डायबिटिस, टॉक्सेमिया असे काही आजार झाले तर होते. काहींना शारीरिक आजार किंवा संसर्गजन्य आजारांमुळे कानाचे विकार होतात.

कानाच्या विकारांची कारणेजास्त आवाजाचा संपर्क-अति आवाजाच्या ठिकाणी काम केल्याने किंवा राहिल्याने श्रवणशक्ती कमी होऊ शकते. जिथे मोठा आवाज, गोगाट असेल तिथे फार वेळ थांबू नये, श्रवणशक्तीवर परिणाम होऊ शकतो.

कानाच्या विकारांपासून बचाव कसा कराल?मुलांना अंघोळ घालताना त्याच्या कानात पाणी जाऊ नये याची दक्षता घ्यावी. अंघोळीनंतर कान स्वच्छ, कोरडे करा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांच्या कानामध्ये तेल घालू नये. कानांची तपासणी केली पाहिजे. ध्वनी प्रदूषणामुळे कानांची ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागते.

वाढत्या आवाजामुळे होणारे परिणाम७० ते ८० डेसिबलपेक्षा जास्त आवाज हा कानांसाठी धोकादायक असतो. यामुळे आपल्या ऐकण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो. काहींना तर बहिरेपणाचाही सामना करावा लागतो. तसेच मोठ्या आवाजामुळे हृदयाचे ठोके वाढणे याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे.

कानाच्या विकारांचे प्रकार किती?कानाचा संसर्ग, टिनिटस (कानात आवाज येणे), मेनियर डिसीज (ज्यामुळे श्रवणशक्ती कमी होते आणि शरीराचा तोल सांभाळण्यात अडचणी येतात), कानाचा पडदा फाटणे, इअरवंक्स (कानात मेण जमा होणे), ओटाइटिस मीडिया (कानात सूज येणे), स्विमर्स इअर (पोहताना कानात पाणी जाणे)

शारीरिक इजा किंवा संसर्गजन्य आजारकानांची व्यवस्थित स्वच्छता न ठेवल्यास दातदुखी, मार लागणे, अॅलर्जी होणे, सौंदर्यप्रसाधनाचा वापर करणे अशा कारणांमुळेही कानाची समस्या होऊ शकते. मार लागल्यास या मुलांना झोपून स्तनपान करवल्यास त्यात इन्फेक्शनची भीती वाढते. कानातील मळ काढण्यासाठी काड्या वापरू नये.

"कानामध्ये वेदना होत असतील, जड वाटत असेल, वारंवार खाज सुटत असेल तर अशावेळी दुर्लक्ष अजिबात करू नका. कानातील घाण काढण्यासाठी इअर बर्डचा वापर करावा, काडी टाकू नये, त्यामुळे जखम होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या परवानगी शिवाय कानात कोणतेही औषधे टाकू नये"- डॉ. आशिष पोडे, कान, नाक तज्ज्ञ, चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्यchandrapur-acचंद्रपूर