बाळाच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवले, तर टाइप-१ प्रकारचा मधुमेह असलेल्या मुलांनाही सर्वसामान्य आयुष्य जगता येणे शक्य आहे. सुदृढ मुलाच्या शरीरातील साखरेचे प्रमाण १०० ते १८० असायला हवे.
आजारामुळे मुलाच्या शरीरातील इन्सुलिन घटते आणि त्यांना इन्सुलिनचा वेगळा डोस द्यावा लागतो. रक्तातील साखरेच्या पातळीवर लक्ष ठेवले, तर टाइप-१ प्रकारचा मधुमेह असलेल्या मुलांनाही सर्वसामान्य आयुष्य जगता येणे शक्य आहे.
बाॅक्स
काय आहेत लक्षणे...
वारंवार लघवी करणे
वजन न वाढणे
थकवा जाणवणे
गरजेपेक्षा अधिक तहान लागणे
बाॅक्स
आई-वडिलांना डायबिटीस असेल, तर...
बहुतांश वेळा आई- वडिलांना डायबिटीस असेल, तर तो मुलांनाही होतो. मात्र, याचे प्रमाण अत्यल्प आहे. अनेक वेळा लहान बालकांना मूत्रमार्गात इंफेक्शन झाल्यास हा आजार उद्भभवू शकतो, तसेच अनियंत्रित आहारामुळेही हा आजार होऊ शकतो.
बाॅक्स
बालरोगतज्ज्ञ काय म्हणतात...
लहान बाळाला टाइप-१ डायबिटीस आजार होऊ शकतो. मात्र, वेळीच इलाज केल्यास यावर नियंत्रण आणता येते. बाळाला लक्षणे दिसल्यास प्रथम शुगर, तसेच लघवी टेस्ट करून निदान केले जाते. लक्षणे आढळल्यास त्वरित डाॅक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
-डाॅ. अभिलाषा गावतुरे,
बालरोगतज्ज्ञ चंद्रपूर
कोट
टाइप-१ डायबिटीस आजार असलेल्या बालकाचे वजन वाढत नाही. बाळ अस्वस्थ असते. अशावेळी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याची रक्ततपासणी करून यातून निदान काढले जाते. योग्य उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रणात येतो.
-डाॅ. गोपाल मुंधडा,
बालरोगतज्ज्ञ चंद्रपूर