शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

तीन पिढ्यांचा वैचारिक संघर्ष: वाटा पळवाटा

By admin | Updated: November 29, 2014 01:06 IST

शासनाने पुरग्रस्तांसाठी उभारलेल्या वस्तीवर खुद्द पवार नामक कंत्राटदाराचाच डोळा असतो. त्या वसाहतीतील घरे संबंधित लाभार्थींना मिळण्याऐवजी ...

संतोष कुंडकर चंद्रपूरशासनाने पुरग्रस्तांसाठी उभारलेल्या वस्तीवर खुद्द पवार नामक कंत्राटदाराचाच डोळा असतो. त्या वसाहतीतील घरे संबंधित लाभार्थींना मिळण्याऐवजी आपल्या नातलगांना मिळावी, यासाठी त्याचा प्रयत्न असतो. हाच कंत्राटदार शहरातील एका महाविद्यालयाचा अध्यक्षदेखील असतो. मात्र त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणारा आणि सामाजिक जाणिवा असलेला अर्जुन कंत्राटदाराचा हा कट उधळून लावतो. वसाहतीतील घरांची कुलूपे तोडून ती घरे गरजू दलित लाभार्थ्यांना अर्जुन मिळवून देतो. मात्र पवारांच्याच महाविद्यालयात कार्यरत प्रा.सतीश यांना अर्जुनचे हे कृत्य पटत नाही. कायदा हातात घेण्याला त्यांचा विरोध असतो. बाबासाहेब आंबेडकरांसोबत प्रत्यक्ष कार्य करणारे प्रा.सतीश यांचे काका मात्र अर्जुनची बाजू घेऊन त्याच्या आंदोलनात सहभागी होतात. या दरम्यान, कंत्राटदार पवार यांच्याशी जवळीक असलेल्या दासरावची मुलगी अर्जुनच्या प्रेमात पडते. अर्जुनही मनातून तिच्यावर प्रेम करीत असला तरी तो ते व्यक्त करीत नाही. उलट तिच्यापासून तो दूर राहण्याचा प्रयत्न करतो. प्रा.सतिश यांची पत्नी हेमा ही ब्राम्हण कुटुंबातील असते. तिचा आणि काकांचा वैचारिक संघर्ष सुरू असतो. काका नेहमी तिला जातीच्या मुद्यावरून टोमणे हाणत असतात. यादरम्यान, अर्जुनला अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या मागावर असतात. मात्र प्रा.सतिशची पत्नी हेमा त्याला मदत करते. यातून मोठा संघर्ष निर्माण होतो. अखेर अर्जुनचा या संघर्षात विजय होतो. असे मध्यवर्ती कथानक असलेले ‘वाटा पळवाटा’ हे नाटक यवतमाळच्या कलावैभव नाट्य व सांस्कृतिक संस्थेने चंद्रपूर येथे सुरू असलेल्या राज्यस्तरिय नाट्य स्पर्धेत सादर केले.दत्ता भगत लिखीत या नाटकाचे दिग्दर्शन अविश वत्सल बन्सोड यांनी केले. नेपथ्य गजानन कासार, दिलीप भगत यांचे होते. प्रकाश योजना अशोक कार्लेकर यांची होती. संगीत प्रबोध मडावी, चेतन बालपांडे यांची तर वेशभूषा मीरा मडावी, प्रगती कोलारकर यांची होती. या नाटकात दशरथ मडावी (प्रा.सतीश), काका (अविश बन्सोड), चारूलता पावशेकर (हेमा), संगीतराव बारी (दासराव), राज पावशेकर (ईन्स्पेक्टर), प्रशंसा पाटणकर, (सोनल), रोहीत राठोड, (अरविंद देशमुख), तर चेतन दुरतकर, नंदकिशोर तिरमारे, सचिन भगत यांनी विद्यार्थ्यांची भूमिका केली. नाटकाचे कथानक चांगले असले तरी नाटक संथगतीने पुढे गेले. त्यामुळे अधून-मधून ते रटाळ वाटत होते. काही प्रसंगात मात्र कलावंतांनी जीव ओतला. त्याला प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून दादही दिली. यातील दशरथ मडावी, चारू पावशेकर, आणि अविश बन्सोड यांच्या दमदार अभिनयानेच या नाटकाने तग धरली. संवाद विसरण्याचा प्रकारही अनेकदा खटकून गेला. नेपथ्य मात्र उत्तम होते. यातील अर्जुनची भूमिका करणाऱ्या विवेक कांबळे या कलावंताला आवाजाचा तोल सांभाळता आला नाही. ‘अ‍ॅग्रेसीव’ स्वभाव दाखविण्याच्या नादात त्याचा अभिनय नाटकी होत गेला. चारू पावशेकर यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला. मात्र त्यांचे संवाद प्रेक्षकांपर्यंत पोहचत नव्हते. दिग्दर्शक अविश बन्सोड यांनी केलेली काकाची भूमिका मात्र सुंदर वठविली.