शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

पतीला कटकारस्थान करून फसविण्यात आले

By admin | Updated: November 4, 2015 00:54 IST

येथील साप्ताहिकाचे पत्रकार शालिक सहारे यांची पार्श्वभूमी गुन्हेगार स्वरूपाची नसताना केवळ पोलीस निरीक्षकाविरुद्ध आवाज उठवून...

शीला सहारे यांचा आरोप : पत्रकार मारहाण प्रकरणब्रह्मपुरी : येथील साप्ताहिकाचे पत्रकार शालिक सहारे यांची पार्श्वभूमी गुन्हेगार स्वरूपाची नसताना केवळ पोलीस निरीक्षकाविरुद्ध आवाज उठवून बातम्या प्रकाशित केल्या व त्याची लेखी तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत केल्याने माझ्या पतीला पोलीस निरीक्षकांनी कटकारस्थान रचून फसविण्यात आल्याचा आरोप शालीक सहारे यांच्या पत्नी शिला सहारे यांनी केला आहे.त्यांनी पत्रकात नमुद केल्यानुसार म्हटले आहे, पोलीस निरीक्षक के.डी. नगराळे यांच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे बेकायदेशीररित्या दडपल्याप्रकरणी त्यांच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत. तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची खत प्रकरणात झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस निरीक्षकांना अभय दिले होते. त्या विरुद्ध माझ्या पतीने बातम्या प्रकाशित करुन प्रकरण उचलून धरले, असे म्हटले आहे. ब्रह्मपुरीत मागील पंधरवड्यात नऊ लाखाची दारू हस्तगत करून त्यात आरोपीला अटक झाल्याने त्याला हाताशी धरुन माझे पती विरुद्ध खंडणी व अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली अटक करून पोलीस कोठडीत पाठविले. आहे हे केवळ वैयक्तिक वचपा काढण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी केले आहे. कारण मी अनुसूचित जातीची असून पती शालीक सहारे यांनी माझ्याशी लग्न केले आणि आमचा संसार सुरळीत आहे. जर त्यांना या जातीची घृणा असती तर त्यांनी माझ्याशी लग्नच केले नसते. त्यामुळे या कायद्याचा वापर सर्रास खोटे स्वरूपाचा माझ्या पतीवर लावल्या गेला आहे. माझ्या पती विरुद्ध गुन्ह्याची नोंद होताच तपास न करता केवळ एफआयआरच्या आधारे तत्काळ अटक केली आणि त्याबाबत आम्हाला सुचना दिली नाही. पतीला भेटायला गेली असता, मला पोलीस निरीक्षकांनी भेटू दिले नाही. ही संपूर्ण बाब बेकायदेशिर असून ठाणेदार व अवैध धंदेवाले यांनी जाणीवपूर्वक कट रचून, कायद्याचा दुरुपयोग करुन माझ्या पतीला फसविले असल्याचा आरोप शिला सहारे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. (तालुका प्रतिनिधी)