शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात ओबीसींचे अन्नत्याग आंदोलन; उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2023 12:27 IST

अन्नत्यागाचा ११ वा दिवस : ओबीसी युवकांकडून भीक मागून सरकारचा निषेध

चंद्रपूर : ओबीसींच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रवींद्र टाेंगे यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला गुरुवारी ११ दिवस झाले. त्यांची प्रकृती आता दिवसेंदिवस खालावू लागली. मात्र, शासनाने आंदोलनाची अद्याप दखल न घेतल्याने ओबीसी युवकांनी गुरुवारी भीक मांगो आंदोलन करून निषेध नोंदविला. भिकेतून मिळालेली रक्कम सरकार सरकारकडे मनीऑर्डरद्वारे पाठविण्यात आले.

ओबीसी समाजाच्या मागणीनुसार सरकारने राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाची घोषणा अंमलात आणावी,  जातनिहाय जनगणना व स्वाधार योजना लागू करावी, आदींसह विविध मागण्या घेऊन रवींद्र टाेंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करीत आहेत. ओबीसी, व्हीजे एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ७२ ओबीसी वसतिगृह, आधार योजना, विदेश शिष्यवृत्तीसाठी सरकारने निधी दिला नाही. सहा वर्षांपासून ओबीसी विद्यार्थ्यांच्या ७२ वसतिगृहाचा विषय शासनाने अजूनही सोडवला नाही, असा आरोप आहे. उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी, अन्यथा गंभीर परिणाम उमटतील, असा इशारा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी दिला.

मुंडन करून सरकारविरुद्ध घोषणाबाजी

ओबीसींच्या प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करून गुरुवारी ओबीसी कार्यकर्त्यांनी रवींद्र टोंगे यांच्या उपोषणस्थळी मुंडन केले. आंदोलन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण मंत्र्यांचे मुखवटे लावल्याने नागरिकांत चर्चेचा विषय झाला. मुंडन करून सरकारविरुद्ध घोषणाबाजी झाली. महेश खंगार, अंबादास वनकर, संदीप तोडसाम, दिलीप डोंगरे, कृष्णा चांदेकर, संतोष कुकडकर यांनी मुंडन करत सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, माजी नगरसेवक नंदू नागरकर, सुभाष गौर, राजेश बेले, देवा पाचभाई, माजी नगरसेविका सुनीता लोढिया, ॲड. वैशाली टोंगे, विजय फाले उपस्थित होते.

आज ओबीसी संघटनांची बैठक

शासनाविरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी आज (दि. २२) रोजी ओबीसीमधील सर्व जातीय संघटनांची चंद्रपूर तुकूम येथील मातोश्री सभागृहात दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठक यशस्वी व्हावी यासाठी जिल्ह्यातील ओबीसी संघटना कामाला लागल्या आहेत.

टॅग्स :OBCअन्य मागासवर्गीय जातीchandrapur-acचंद्रपूरStrikeसंप