शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
2
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
3
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
4
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
5
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
6
कोण आहे डॉ. मुजफ्फर? ज्याला पकडण्यासाठी सीबीआय घेतेय इंटरपोलची मदत! अफगाणिस्तानाशी आहे कनेक्शन
7
"बिहारमध्ये भाजपचा जो स्ट्राइक रेट आला, तसा तर आमचा 1984 मध्येही नव्हता"; काँग्रेसला अजूनही निकालावर विश्वास बसेना 
8
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
9
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
10
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
11
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
12
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
13
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
14
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
15
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
16
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
17
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
18
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
19
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
20
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी आल्या शाईच्या शेकडो बाटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 22:14 IST

केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले असून निवडणुकीसाठी निवडणूक आयोग सज्ज झाला आहे. कोणत्याही निवडणुकीत महत्त्वाची असते ती म्हणजे, मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटावरची निळी शाई. या बोटावरच्या शाईची किंमत कोट्यवधी रूपयांमध्ये जाते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने शाईच्या २६ लाख बाटल्यांची आर्डर दिली आहे.देशभरात ९० कोटी मतदार संख्या असून त्यासाठी लागणाऱ्या निळ्या शाईच्या २६ लाख बाटल्या मागविण्यात आल्या आहेत. याची किंमत जवळपास ३३ कोटी रुपये आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला ११ एप्रिलपासून सुरूवात होत आहे. सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणूक पार पडणार असून १९ मे रोजी अंतिम मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. २००९ च्या निवडणुकीची तुलना करता यंदा निळ्या शाईच्या किंमतीत तीन पट वाढ झाली आहे. २००९ मध्ये निळ्या शाईची किंमत १२ कोटी रुपये होती. तर मागील २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यंदा साडेचार लाख बाटल्या अधिक मागविण्यात आल्या आहेत.एका बाटलीमध्ये १० मिली निळी शाई असते. एका बाटलीमधून किमान ३५० मतदारांवर निळ्या शाईचं निशाण लावू लकतो.२००४ च्या निवडणुकीवेळी मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटावर केवळ एक ठिपका निळ्या शाईचा लावण्यात येत होता. मात्र २००६ रोजी निवडणूक आयोगाने ठिपक्याऐवजी सरळ लाईन आखण्याचे निर्देश दिले. त्यामुळे शाईचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बाटल्या देण्यात येतात. सर्वात जास्त बाटल्यांचा वापर उत्तर प्रदेशात केला जातो.मतदानापूर्वी मतदान केंद्रावर हाताच्या बोटावर लावली जाणारी शाई ही म्हैसूरवरून संपूर्ण देशात पाठवली जाते. सर्वप्रथम १९६२ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शाईचा वापर करण्यात आला. यानंतर देशात होणाºया प्रत्येक निवडणुकीत शाईचा वापर होऊ लागला. चंद्रपूर लोकसभा मतदार क्षेत्रामध्ये विधानसभानिहाय केंद्रामध्ये शाही पाठविण्यात येणार असून बॉटल बॉक्समध्ये बंद करण्यात आल्या आहे.म्हैसूरची शाई प्रसिद्धदेशातील काही भागात बोगस मतदान होत असल्याच्या घटना घडत असल्याने या घटना थांबवण्यासाठी या पद्धतीचा उपयोग करण्यात आला. म्हैसूरची शाई ही निळी शाई बोटावर लावल्यानंतर पुसता येत नाही. ही शाई म्हैसूर येथील एका वॉर्निश कंपनीमध्ये तयार होते. या कंपनीकडून जगातील २५ देशांना निवडणुकीची शाई दिली जाते. आपल्या देशालाही निवडणुकीसाठी शाईचा पुरवठा करण्याचे कंत्राट याच कंपनीला देण्यात येते. म्हणूनच निवडणुकीत वापरल्या जाणाºया या शाईला ‘म्हैसूरची शाई’ म्हणून ओळखली जाते.