शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

शेकडो हेक्टर शेती भूईसपाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 23:16 IST

गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले.

ठळक मुद्देशेतकरी पुन्हा संकटात : शेतातील पिके वाहून गेली

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गुरुवार,शुक्रवार आणि रविवारी पडलेल्या पावसाने जिल्ह्यातील नदी, नाल्यांना पूर आला. या पुरामुळे जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती अक्षरश: भूईसपाट झाली. शेतात मोठ्या मेहनतीने उभे केलेले पीक क्षणार्थात पुराने वाहून गेले. शेतीचे आता वाळवंट झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकऱ्यांचे हिरवे शिवार पूर्णत: मातीमोल झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने पुन्हा नुकसान भरपाई देण्याची गरज निर्माण झाली आहे.यावर्षीचा सर्वाधिक पाऊस या दोन दिवसात पडला. जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, चिमूर, चंद्रपूर, सिंदेवाही या पाच तालुक्यात अतिवृष्टी झाली. इतर तालुक्यातही जोरदार पाऊस झाला. या संततधार पावसाने अचानक नदी, नाल्याला पूर आला. या पूरामुळे नदी, नाल्याच्या काठावरील शेतपिकांना चांगलाच फटका बसला. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर राजुरा तालुक्यातील गोवरी, सास्ती, पोवनी, चिंचोली, भोयेगाव, अंतरगाव, मुठरा, चंदनवाही, कळमना, नाईकनगर, पांढरपौनी, हरदोना, कढोली (बु.) साखरी, वरोडा, पार्ली, निर्ली मानोली, बाळापूर, नदी पड्यातील पुरामुळे अक्षरश: खरडून गेली. यासोबत सिंदेवाही, मूल, नागभीड या धानपट्टयातील धानपºहे पाण्याखाली येऊन भूईसपाट झाले. गडचांदूरजवळच्या कारवा येथील सात एक शेती तर पूर्णता वाहून गेली.शेतकºयांनी नुकतीच कपाशी, सोयाबिन लागवड करुन खत देऊन पिकांची जोपासना केली होती. कसेबसे पीक वाढून डवरीणवर आले असताना पुरामुळे क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले.भोवरी येथील शेतकरी भाऊराव रणदिवे, अनिल रणदिवे, अमित रणदिवे यांचे शेत पुरामुळे अक्षरश: खरडून नेले तर नाल्याकाठावरील बंडू जुनघरी यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात मातीचा गाळ साचल्याने पिक दिसेनासे झाले आहे. हे फक्त याच शेतकºयांचे नुकसान नाही तर जिल्ह्यातील नदी,नाल्याच्या काठावर असणाºया शेकडो हेक्टर शेतीला पुराचा जबरदस्त तडाखा बसल्याने पिकेच पूर्णत: भूईसपाट झाली आहे. शेतकºयांनी पै पै गोळा करुन पिकांची लागवड केली होती. मात्र निसर्गाचा प्रकोप आल्याने शेकडो हेक्टर शेतीचे होत्याचे नव्हते झाले. यामुळे शेतकऱ्यांवर डोक्यावर हात ठेऊन अश्रू गाळण्याची दुदैवी वेळ आली आहे.शेतीचे साहित्य, खते वाहून गेलीशुक्रवारी रात्रीच्या सुमारास नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतकºयांनी शेतात ठेवलेली शेती उपयोगी सर्वच साहित्य पुरात वाहून गेले. काही शेतकºयांनी पिकांना खत देण्यासाठी शेतात नेऊन ठेवले होते. पण अचानक आलेल्या पुरामुळे महागडे खत, कुटार, कडबा सर्वच वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर फार मोठे संकट ओढविले आहे.आश्वासन नको, तात्काळ मदत द्याशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांजवळ एक पैसाही शिल्लक नाही. शासनाने नुकसानीचे सर्व्हेक्षण करण्याचे आदेश दिले असून सर्व्हेक्षण सुरू आहे. मात्र शासनाने पूरग्रस्त शेतकºयांना तातडीने मदत दिली नाहीतर शेतकºयांना आपल्या शेतात पैशाअभावी काहीच पेरता येणार नाही. बि-बियाणे घेण्यासाठी शेतकºयांना शासकीय मदतीची नितांत गरज आहे. त्यासाठी आश्वासन नको तात्काळ मदत द्या, असा सूर शेतकरी वर्गात उमटत आहे.शेतकऱ्यांच्या नशिबी कायम संघर्षचपाऊस येऊनही बुडवेल आणि जाऊनही बुडवेल, अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. असाच काहीसा संघर्षमय प्रवास शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे. संततधार पावसाने क्षणार्थात शेकडो हेक्टर शेती उद्ध्वस्त केली. त्यामुळे शेतकरी आर्थिक़ संकटात सापडला आहे.पुरामुळे राजुरा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकºयांना मदत मिळवून देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहे.- सुनील उरकुडे, जि.प. सदस्य.