मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 10:08 PM2019-03-16T22:08:07+5:302019-03-16T22:08:25+5:30

मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी केले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ‘मानव अधिकार व दुर्लक्षित समाज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

Human rights must be protected | मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे

मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे

Next
ठळक मुद्देजार्ज एडवर्ड रिचर्ड : शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मानवाधिकाराशिवाय कोणत्याही व्यक्तीला सन्मानाने जगता येत नाही. जगातील प्रत्येक देशात हीच मागणी ऐरणीवर आहे. त्यामुळे मानवाधिकाराचे संरक्षण झालेच पाहिजे, असे प्रतिपादन अमेरिकेतील अमेरिकेतील एडीनबोरो विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॉ.जॉर्ज एडवर्ड रिचड यांनी केले. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील ‘मानव अधिकार व दुर्लक्षित समाज’ या विषयावर आंतरराष्ट्रीय चर्चासत्राप्रसंगी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
शांताराम पोटदुखे यांच्या स्मृतीनिमित्त महाविद्यालयाच्या छोटूभाई पटेल स्मृती सभागृहात हा कार्यक्रम झाला. चर्चासत्राला शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ, संशोधक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. चर्चासत्रात युजीसी मान्यताप्राप्त नियतकालिकेतील ६५ शोधनिबंध प्रकाशित करण्यात आले. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश विकास सिरपूरकर, संस्था उपाध्यक्ष रमेश मामीडवार, सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ.अंजली हस्तक, डॉ.ए.पी.पिल्लई, अ‍ॅड. कुमकुम सिरपुरकर आदींची उपस्थिती होती. निवृत्त न्यायमूर्ती सिरपूरकर उद्घाटनपर भाषणात दुर्लक्षित समाजाची व्याख्या स्पष्ट केली.
ते म्हणाले, दुर्लक्षित समाज व मानव अधिकार या दोन्ही संकल्पना आजच्या समाज जीवनात अभ्यासणे व त्याचे विश्लेषण करणे काळाची गरज आहे. सिरपूरकर कुटुंबीयांतर्फे अ‍ॅड.एस.वाय. सिरपूरकर व सुनंदा सिरपूरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुवर्ण पदक प्राप्त विधी विद्यार्थ्यांना प्रायोजित करण्यात येत असल्याची घोषणा केली. माजी प्राचार्य पिल्लई यांनी भारतीय संविधानातील तरतुदींची माहिती दिली.प्राचार्य डॉ. हस्तक प्रास्ताविक, संचालन उपप्राचार्य डॉ. बेन्नी एम.जे. व प्रा.डॉ.पूर्णेदू कार यांनी केले. आभार प्रा.डॉ.मनिषा आवळे यांनी मानले. यावेळी शफीक अहमद, अ‍ॅड. संजय सिरपूरकर, मंजूषा थोडगे, अ‍ॅड. अजित लाभे, अ‍ॅड. पुरुषोत्तम सातपुते, चकनलवार, डॉ. संजयकुमार सिंग उपस्थित होते.
प्रथम सत्राचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ.श्रीकांत कोमावार व वक्ते म्हणून डॉ. अशोक पावडे, अ‍ॅड. जयश्री सातपूते, प्राचार्य डॉ. फडणवीस, प्राचार्य डॉ. चांडक, प्रा.डॉ.पंकज काकडे यांनी सत्रात सहअध्यक्ष म्हणून भूमिका पार पाडली. संचालन अ‍ॅड. नंदिता नायर व अ‍ॅड. वनिता लालवाणी यांनी केले.

Web Title: Human rights must be protected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.