शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीशिवाय वाघाला पकडले कसे? वाघाला पकडण्यासाठी अटींचे पालन झाले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 12:38 IST

Chandrapur : प्रधान मुख्य वनसंरक्षकांना कल्पनाही नाही

राजेश भोजेकर लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : जिल्ह्यात हल्लेखोर वाघांना विनापरवानगीनेच पकडण्याचा नवा पायंडा पाडताना वन विभागाचे अधिकारी दिसत आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीविनाच वाघांना पकडल्याची धक्कादायक माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.

दि. १७ डिसेंबर २०२४ रोजी पोंभुर्णा उपवनक्षेत्रात एका वाघिणीला वन विभागाने परस्पर बेशुद्ध करून जेरबंद केले. 'लोकमत'ने लक्ष वेधल्यानंतर परवानगीचे सोपस्कार पार पाडल्याची माहिती आहे. १० जानेवारीला नागभीड वनपरिक्षेत्रात एका वाघाने एकाला हल्ला करून ठार केले. दि. १२ जानेवारीला म्हणजे दोन दिवसातच त्या वाघाला जेरबंद करण्यात आले. वाघाला पकडल्यानंतर परवानगीचे प्रयत्न केल्याची माहिती सूत्राने दिली. १४ जानेवारीला बल्लारपूर वनक्षेत्रात एका वनमजुराला वाघाने ठार केले. यानंतर वाघ तिथेच बसून असताना वन विभागाने त्या वाघाला बेशुद्धीचे इंजेक्शन मारून जेरबंद केले. या वाघाला इतक्या तातडीने पकडण्यासाठी परवानगी दिली होती काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

मग, 'येडा अण्णा'ला का जीव गमवावा लागला? 

  • २०१८ मध्ये चिमूर तालुक्यातील जंगलात 'येडा अण्णा' नावाने ओळखला जाणारा वाघ एकाच जागेवर जखमांनी विव्हळत होता.
  • त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांच्या परवानगीची वाट पाहावी लागली. परवानगी येताच येडा अण्णाने उपचारांच्या प्रतीक्षेत जीव गमावला. 
  • वन विभागाचे धोरण नेमके काय? असा प्रश्न या घटनांनी निर्माण झाला आहे.

वाघाला पकडण्यासाठी अटींचे पालन झाले का? वाघाच्या पूर्व इतिहासाचा तपशील तपासणी सूची मनुष्यहानी, जखमी प्रपत्र पशुहानी, जखमी प्रपत्र कॅमेरा ट्रॅपमधील वाघाचे फोटो गावकऱ्यांचे निवेदन जीआरटी टीम व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या गस्तीचे फोटो मानव-वन्यजीव संघर्ष काळातील उपाययोजना

टॅग्स :Tigerवाघchandrapur-acचंद्रपूर