शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सारखे नाव-आडनावाचे किती राव !

By admin | Updated: November 1, 2016 00:56 IST

सारखे नाव आणि सोबतीला त्यांचे सारखे आडनाव असणे, ही तशी नवीन गोष्ट नाही.

बामणी दुधोली येथील प्रकार : निवडणुकीत उद्भवला होता पेचवसंत खेडेकर बल्लारपूरसारखे नाव आणि सोबतीला त्यांचे सारखे आडनाव असणे, ही तशी नवीन गोष्ट नाही. मात्र, अवघे साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या लहान गावात अशांची संख्या दोन ते पाच पर्यंत असली की त्याला नवलच म्हणावे लागेल. आणि हा नवलाचा प्रकार बल्लारपूर शहराला लागून असलेल्या बामणी (दुधोली) या गावात बघायला मिळतो आहे. ‘साळवे’ असे हे आडनाव! साळवे या आडनावाने व त्यांचे प्रथम नावही सारखे असणारे किती जण तरी गावात आहेत. बामणी येथे साळवे नावांची सुमारे ५० कुटूंब असतील. त्यामुळे, साळवे आडनाव असणाऱ्यांची संख्या निश्चितच दोनशेच्या आसपास असणार! काही साळवे कुटूंबांनी योगायोगाने आपल्या कुटूंबातील मुलांची नावे सारखीच ठेवली आहेत. याच कारणामुळे प्रथम नाव व आडनाव सारखे असे घडत गेले आहे, अशी बरीचशी नाव या गावात आहेत. फरक फक्त त्यांच्या वडिलांची नावे वेगवेगळी आहेत, एवढेच! उदाहरण द्यायचे झाल्यास या गावात रविंद्र साळवे नावाचे चार जण आहेत. सुरेश व दिनकर साळवे नावाचे प्रत्येकी चार, एकनाथ, वामन, विठोबा, शंकर, नामदेव व गणपती नावाचे प्रत्येकी दोन अशी व्यक्ती आहेत. नावातील या साम्यामुळे बरेचदा गोंधळही उडतो. निवडणुकीत एकाच वार्डात सारख्या नावाचे दोन साळवे उभे झाले की नेमका ‘तो’ साळवे कोण याबाबत मतदारही संभ्रमात पडतात. असा प्रकार निवडणूकीप्रसंगी येथे घडल्याचे जाणकार सांगतात. या गावात साळवे कुटूंबाची संख्या खूप मोठी असल्याने बामणीला ‘साळवेंची बामणी’ असेही म्हटले जाते. माजी आमदार, सामाजिक कार्यकर्ते तथा विचारवंत अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांचे हे जन्मगाव! सध्या त्यांचे वास्तव्य याच गावात आहे. आज बामणी (दुधोली) येथे स्थायिक होऊन असलेले सारे साळवे कुटूंब हे मूळचे वर्धा नदीच्या अगदी काठावर रेल्वे पुलाजवळील दुधोली या गावचे होत. नदीला दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे दुधोली गाव पुराने वेढला जाऊन घर-जनावरांची हानी होत असे. त्यामुळे शासनाने हे गाव बल्लारपूर-कोठारी मार्गावरील दुधोली या गावालगत त्याला लागूनच पुनर्वसित केले. बामणीचे त्यानंतर बामणी-दुधोली असे नाव पडले. दुधोलीतील सर्व साळवे येथे येऊन वसल्याने साळवे कुटूंबियांची संख्या या गावात सर्वाधिक आहे.बामणीचे शैक्षणिक-औद्योगिक महत्त्वसुमारे साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या या गावाला शैक्षणिक व औद्योगिक दृष्ट्याही महत्त्व आहे. येथे बालाजी विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, जव्हेरी कन्या महाविद्यालय, बी.एड. कॉलेज, मोंटफोर्ट हायर सेकंडरी स्कूल, बल्लारपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलाजी (बीआयटी), पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे बीआरसी केंद्र, बामणी प्रोटीन्स, खर्डा फॅक्टरी, आॅईल मिल असे उद्योग येथे आहेत.