शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

वनविभागाच्या निवासस्थानांना घरघर

By admin | Updated: July 13, 2017 00:37 IST

चंद्रपूर जिल्ह्यात जंगलासोबतच मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत. वन्यजीव व जंगलाचे समतोल राखण्याच्या दृष्टीने शेकडो वनकर्मचारी मूल तालुक्यात कार्यरत आहेत.

मूलमधील कर्मचाऱ्यांची अडचण : बफरझोनच्या निवासस्थानात नॉन बफर झोनचे कर्मचारीलोकमत न्यूज नेटवर्कमूल : चंद्रपूर जिल्ह्यात जंगलासोबतच मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत. वन्यजीव व जंगलाचे समतोल राखण्याच्या दृष्टीने शेकडो वनकर्मचारी मूल तालुक्यात कार्यरत आहेत. वनकर्मचाऱ्यांना जंगलाचे रक्षण करणे सोपे जावे यासाठी मूल येथील वनविभाग कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. मात्र या वसाहतीतील अनेक निवासस्थाने पडक्या स्थितीत आहेत. ते दुरुस्त करण्याचे सौजन्य वनविभाग दाखवित नसल्याने कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.येथील वनविभागाचे कार्यालय चिचपल्ली वनविभागाशी जोडण्यात आलेले आहे आणि मूल वनविभाग हे अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्यात आलेले आहे. अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्याआधीच मूल येथील वनविभागाच्या वसाहतीमधील निवासस्थाने पडक्या अवस्थेत होते. असे असतानाही एक ते दोन वनकर्मचारी निवासस्थानाचा आसरा घेत आहे. परंतु सुव्यवस्थीत असलेल्या निवासस्थानात मूल येथील नॉनबफर वनविभागातील वनरक्षक शिवरकर राहतात.मूल वनपरिक्षेत्र (बफर) मध्ये ६ निवासस्थाने राहण्यायोग्य आहेत. त्यामध्ये ३ बफरझोन क्षेत्रातील तर २ नॉनबफर क्षेत्रातील कर्मचारी वास्तव्य करीत आहे. तर एकाची बदली झालेली आहे. मूल वनपरिक्षेत्र (बफर)चे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून एस.जे. बोबडे कार्यरत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे हे त्यांच्या निवासस्थानामध्ये तर क्षेत्र सहायक तावाडे हे एका निवासस्थानात राहतात. तर नॉनबफर वनविभागातील मूलचे क्षेत्र सहाय्यक एस.एम. बालपने राहतात. वनरक्षकाच्या निवासस्थानामध्ये नॉनबफर वनविभागाचे वनरक्षक शिवरकर, बफरझोन वनविभागाचे वनरक्षक महेश म्हस्के राहतात.येथील वनविभागाच्या वसाहतीत सहा पेक्षा जास्त निवासस्थाने आहेत. परंतु ते पडक्या अवस्थेत असल्यामुळे त्यांचा उपयोग वनकर्मचाऱ्यांना करता येत नाही. नादुरुस्त निवासस्थानांची दुरुस्ती होत नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना खाजगी घरांचा आसरा घ्यावा लागत, आहे हे विशेष!