शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दिवा लावण्याचा नादात घरच जळाले; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2020 15:32 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली.

ठळक मुद्देजिवती तालुक्यात दोन घरे जळून राख

लोकमत न्यूज नेटर्कचंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी घरातील लाईट बंद करून दिवे, टार्च लावून दारात उभे राहण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र लावलेल्या दिव्यामुळे जिवती तालुक्यात दोन घरे जळाली. पाटण येथील कुंदन उईके व पल्लेझरी श्रीहरी वाघमारे यांना दिवे लावणे महागात पडले.जिवती तालुक्यातील पाटण येथील कुंदन देवराव उईके यांनी रविवारी रात्री ९ वाजता पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आपल्या घरामध्ये लाईट बंद करून दिवे लावले. त्यानंतर उईके यांचे कुटुंबीय झोपी गेले. दरम्यान, रात्री १ वाजताच्या सुमारास अचानक दिव्यामुळे घराला आग लागली. काही वेळात ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात आली. त्यांनी आरडाओरड केली असता गावातील लोकांनी पाणी टाकून आगीला आटोक्यात आणले. मात्र तोपर्यंत घरातील धान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाले. रोख रक्कम १५ हजार रुपये, एक ते दीड क्विंटल तुरी, स्वस्त धान्य दुकानातून आणलेले ५० किलो धान्य, ज्वारी, वडिलोपार्जित जमिनीचा सातबारा, जातीचे दाखले, मतदान कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी वस्तू आगीत जळाल्याची माहिती कुंदन देवराव उईके, विमल कुंदन उईके यांनी दिली. पाटण येथील पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चौधरी व बिट अमलदार साहेबराव कालापाहड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला.पल्लेझरीतील घरालाही आगजिवती तालुक्यातीलच पल्लेझरी येथील श्रीहरी वाघमारे यांच्या घरालाही रविवारी लावलेल्या दिव्यामुळे आग लागली. श्रीहरी वाघमारे यांनी रविवारी रात्री कोरोनाशी लढा देण्यासाठी आम्ही सारे एक आहोत, हा संदेश देण्यासाठी रात्री ९ वाजता घरी दिवे लावले. मात्र याच दिव्यामुळे त्यांच्या घराला आग लागली. गावकऱ्यांनी पाण्याने ही आग विझविली. मात्र आगीत वाघमारे यांचे मोठे नुकसान झाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस