शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

आहार शिजविण्याचे मदतनिसांचे मानधन थकविले

By admin | Updated: April 15, 2016 01:26 IST

तालुक्यातील करंजी येथील पाच अंगणवाड्यांना गावातीलच जागृती महिला बचत गटाकडून आहार पुरवठा करण्यात येतो.

गोंडपिंपरी : तालुक्यातील करंजी येथील पाच अंगणवाड्यांना गावातीलच जागृती महिला बचत गटाकडून आहार पुरवठा करण्यात येतो. आहार पुरवठा करीत असताना सदर आहार गटामार्फेत शिजवून देणे गरजेचे आहे. मात्र तंटामुक्त विशेष शांतता पुरस्कारप्राप्त करंजी गावात जागृती महिला बचत गटाकडून आहार शिजवून देणे तर सोडाच, आहार शिजविणाऱ्या मदतनिसांना मानधनदेखील गेली सात- आठ वर्षांपासून देण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यातच शासनाच्या निकषानुसारसुद्धा आहार पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे.करंजी गाव हे या ना त्या कारणांनी नेहमी चर्चेत राहते. ४५०० लोकसंख्या असलेल्या करंजी गावात पाच अंगणवाड्या आहेत. त्यात जवळपास दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. सुदृढ आरोग्य, नियमित शाळेत जाण्याची सवय लागावी, पूर्व प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाने अंगणवाड्या सुरू केल्या. त्यातच लहानपणापासून सकस आहाराची सवय लागावी, हासुद्धा हेतू असतो. यासाठी अंगणवाडीतील बालकांना महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाकडून आहार पुरवठा केला जातो. यासाठी करंजी गावात जागृती महिला बचत गट कार्यरत असून त्याच गटाकडून गावात असलेल्या पाचही अंगणवाड्यांना आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र सदर बचत गटाकडून आहार पुरवठा करताना शासनाच्या निकषाला पूर्णपणे बगल दिली जात आहे. आहार शिजवून अंगणवाडीला देणे गरजेचे असताना केवळ धान्याचा पुरवठाच सदर महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे. त्यातही निमुटपणे आहार शिजवून अतिशय तोकड्या मानधनावर काम करणाऱ्या मदतनिसांचे आहार शिजविण्याचे पैसेदेखील दिले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.तंटामुक्तीचा विशेष पुरस्कारप्राप्त गावात ही गंभीर बाब घडणे ही लाजीरवाणी बाब आहे. दरम्यान, सदर महिला बचत गट बदलवून देण्यात यावा, अशी तक्रार अंगणवाडीच्या शिक्षिका व मदतनिसांच्या स्वाक्षऱ्यानिशी ग्रामपंचायत आणि महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे. आजपर्यंत थकविण्यात आलेले मदतनिसांचे आहार शिजविण्याचे मानधन देण्यात यावे, सदर जागृती बचतगट बदलविण्यात यावे आणि शासनाच्या निकषानुसार आहार पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. सदर महिला बचत गट हे माजी सरपंच राहिलेल्या तसेच अंगणवाडी शिक्षिका राहून आणि हल्ली महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या एका कर्मचाऱ्यांच्या मुलीचे असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी)