शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! एकाच चितेवर दोन भावांवर झाले अंत्यसंस्कार; २४ तासानंतर आढळला संदीपचा मृतदेह

By परिमल डोहणे | Updated: October 2, 2023 18:56 IST

रात्री जय बजरंग बली मंडळाचा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करताना चांदली येथील गुंडावार बंधू व सावली येथील गुरुदास दिवाकर मोहुर्ले पाण्यात बुडाले.

चंद्रपूर : गणपती विसर्जनादरम्यान असोलामेंढा तलावाच्या कालव्यात तिघेजण बुडाल्याची घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास सावली येथे घडली होती. निकेश हरिभाऊ गुंडावार (३१) रा. चांदली (बुज), गुरुदास दिवाकर मोहुर्ले (३३) रा. सावली या दोघांचा मृतदेह रविवारी आढळून आला होता. तर संदीप हरिभाऊ गुंडावार (२७) रा. चांदली (बुज) याचा मृतदेह सोमवारी सकाळी भोवर्लाजवळ आढळून आला. शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी चांदली (बुज) त्याच्या मूळ गावी येथे एकाच चितेवर संदीप व निकेश या दोन्ही भावांना मोठ्या भावाने भडाग्नी दिला. हे हृदयद्रावक दृश्य बघून उपस्थितांचे डोळे पाणावले होते.

सावली येथील गणपती विसर्जन शनिवारी होते. रात्री जय बजरंग बली मंडळाचा गणपती हा असोलामेंढा नहारात विसर्जन करताना चांदली येथील गुंडावार बंधू व सावली येथील गुरुदास दिवाकर मोहुर्ले पाण्यात बुडाले. सावली पोलिसांनी शोधमोहीम राबविली. शनिवारी रात्रीच गुरुदास मोहुर्ले याचा मृतदेहच हाती लागला. त्यानंतर, रविवारी सकाळपासून पुन्हा शोधमोहीम सुरू केली. दुपारी निकेश गुंडावार याचा मृतदेह आढळला. परंतु, संदीपचा शोध लागला नव्हता. पोलिसांची शोधमोहीम सुरूच होती. २४ तासांच्या प्रयत्नानंतर सोमवारी सकाळी मृतदेह आढळून आला. संदीप व निकेश या दोन्ही भावंडांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर गुरुदासच्या पार्थिवावर रविवारी सकाळी ११ वाजतादरम्यान चारगाव नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सोमवारी राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी आपल्या दौऱ्यात बदल करून या दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन करून मदतीचा हात दिला.बॉक्स

चार महिन्यांपूर्वीच झाला होता संदीपचा विवाह

चांदली येथील निकेश व संदीप गुंडावार हे दोघे बंधू काही महिन्यांपूर्वी सावली शहरात आले. त्यांनी येथे रसवंतीचा व्यवसाय थाटला. व्यवसायात चांगलाच जम बसला होता. मागील चार महिन्यांपूर्वी संदीपचा विवाह झाला होता. आता संदीप व निकेश या दोघांवरही काळाने घाला घातल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात होती. संदीपच्या मागे वडील, एक भाऊ, पत्नी असा बराच मोठा आप्त परिवार आहे.बॉक्स

२४ तास पोलिसांची शोधमोहीमतीनजण बुडाल्यानंतर सावली पोलिस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात सावली पोलिसांची चमू व आपदा पथक यांनी शोधमोहीम सुरू केली. रविवारीपर्यंत दोघांचा मृतदेह हाती लागला होता. परंतु, संदीपचा मृतदेह आढळून आला नव्हता. पोलिसांनी रात्रीसुद्धा शोधमोहीम सुरूच ठेवली होती. सोमवारी सकाळी संदीपचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे