शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
4
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
5
गुजरात पोलिसांची मोठी कावाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
6
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
7
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
8
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
9
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
10
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
11
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
12
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
13
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
14
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
15
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
16
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
17
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
18
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
19
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
20
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा

४०१ बालकांवर हृदयरोग शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:45 IST

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ४०१ बालकांवर विविध रुग्णालयांमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया तसेच २५१० बालकांवर विविध आजारावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. बालकांमधील वाढते अपंगत्व कमी करून त्यांची तपासणी, निदान आणि उपचार करून देशाची भावी पिढी निरोगी तसेच सुदृढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय आरोग्य अभियान : ० ते १८ वर्षापर्यंतच्या बालकांची करण्यात आली तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यातील तब्बल ४०१ बालकांवर विविध रुग्णालयांमध्ये हृदयरोग शस्त्रक्रिया तसेच २५१० बालकांवर विविध आजारावर शस्त्रक्रीया करण्यात आली आहे. बालकांमधील वाढते अपंगत्व कमी करून त्यांची तपासणी, निदान आणि उपचार करून देशाची भावी पिढी निरोगी तसेच सुदृढ करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सन २०१३-१४ पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत एकूण २४ पथक मंजुर करण्यात आले आहे. त्यांच्या मार्फत अंगणवाडी, तसेच शाळांतील ० ते १८ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येते. या कार्यक्रमांतर्गत बालकांची ४ डीएससाठी तपासणी, निदान आणि उपचार करण्यात आला.अभियानांतर्गत शाळा, अंगणवाडीची तपासणी करण्यात आली. यामध्ये किरकोळ आजारी बालकांवर शाळा तसेच अंगणवाडीमध्येच औषधोपचार करण्यात आला. ज्याचे उपचार अंगणवाडी, शाळांमध्ये होऊ शकत नाही. अशा बालकांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले.हृदयरोग आजार जन्मता व्यंग या प्रकारात मोडत असून या आजारावर वेळेत उपचार न केल्यास बालक दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. हृदयरोग आजार असणाऱ्या बालकांना हा आजार असल्याचे निश्चित करण्याकरिता २ डी इको चाचणी करणे गरजेचे असते. या कार्यक्रमांतर्गत जानेवारी २०१९ मध्ये एसआरसीसी हॉस्पिटल, नारायणा हेल्थ केअर मुंबई यांच्या मार्फत १८१ बालकांवर, एप्रिल २०१९ मध्ये बालाजी हॉस्पिटल मुंबई यांच्या मार्फत ८६ बालकांचे मोफत २ डी इको करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात १ ते १८ वयोगटातील बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी कोणतीही सोय उपलब्ध नसून या आजारावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास २ ते ४ लाख रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असतो. हृदयरोग आजारावर शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च जास्त असल्यामुळे पालक आपल्या पाल्याची हृदयरोग शस्त्रक्रिया करून घेण्यास असमर्थ ठरतात.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत हृदयरोग आजारावर शस्त्रक्रीया करून घेण्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यात सोय उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.बी. राठोड, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथक व जिल्हास्तरीय समन्वयकांनी केलेल्या विशेष प्रयत्नामुळे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ४०१ बालकांची यशस्वी हृदयरोग शस्त्रकिया करून घेण्यात आली. सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, जिल्हा खनिकर्म निधी, सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून करण्यात आली असून आचार्य विनोभा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी, अच्चुत महाराज हार्ट हॉस्पीटल अमरावती, श्रीकृष्ण हृदयालय नागपूर, फोर्टीस हॉस्पीटल मुंबई, एसआरसिसी हॉस्पीटल मुंबई, बालाजी हॉस्पीटल मुंबई आदी रुग्णालयांनी चंद्रपूर जिल्ह्यातील बालकावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.या योजनेंतर्गत बालकांना येण्या-जाण्याची व्यवस्था करून देण्यात येत असून रुग्णालयामार्फत जेवणाचीही व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली.पालकमंत्र्यांचे मानले आभार२०१७-१८ मध्ये राष्ट्रीय स्वास्थ कार्यक्रमांतर्गत हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी येणाºया अडचणी लक्षात घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विशेष प्रयत्न केले. यासाठी जिल्हा खनिकर्म प्रतिष्ठानमधून निधी उपलब्ध करून दिला. या निधीतून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमासाठी २० बालकांच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यामुळे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे शस्त्रक्रिया झालेल्या बालकांच्या पालकांनी आभार मानले. यासोबतच जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकार अधिकारी यांनीही सहकार्य केले.राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ० ते १८ वयोगटांतील बालकांवर मोफत उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यात येते. ज्या बालकांना आजार आहे, अशा बालकांच्या पालकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क करून सदर सेवेचा लाभ घ्यावा.-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सकसामान्य रुग्णालय, चंद्रपूर

टॅग्स :Healthआरोग्य