तळोधी (बा) : भारतात प्रत्येक १६ सेकंदाला एक मुल पहिल्यांदा तंबाखुचे सेवन करते, तर दर दिवशी हा आकडा ५ हजार ५०० मुलांपर्यंत पोहोचतो. भारतात १४.६ टक्के कुमारवयीन मुले तंबाखूच्या अधिन गेलेली आहेत. यात मुलांचे प्रमाण १९ टक्के तर मुलींचे ८.३ टक्के आहे. भविष्यात या मुलांना हृदयविकार, फुफ्फुस आणि श्वासोच्छवासासंदर्भातील आजारस कॅन्सर, वंध्यत्व आणि इतर आजारांना सामोरे जावे लागण्याचा धोका असल्याचे मत सलाम बॉम्बेच्या सर्व्हेक्षणातून उघड झाले आहे.मुलांनी स्वत:च्या आरोग्य, शिक्षण आणि उपजिविकेची निवड करावी, हे सलाम मुंबई फाऊंडेशनचे ध्येय असून २००२ सालापासून ही संस्था मुलांसोबत काम करीत आहे. जी मुले वयाच्या १८ वर्षापर्यंत तंबाखूपासून दूर राहतात, ती आपल्या भावी आयुष्यातही तंबाखू सेवन करण्याची शक्यता कमी असते. याच निकर्षावरून तंबाखूमुक्त शाळेची संकल्पना पुढे आली आहे. सी.बी.एल.सी. बोगेच्या तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्था निकर्षानुसार शिक्षकांनी आपल्या शाळा तंबाखूमुक्त बनविल्या तर प्रत्येक मुलामध्ये तंबाखूविरोधी मानसिकता निर्माण होईल, ते भविष्यात आरोग्यसंपन्न जीवन जगतील. मुलांचे सामाजिक, नैतिक आणि आर्थिक उन्नती होण्यासाठीही तंबाखूमुक्त शाळा उपक्रम हातभार लावेल अशी यामागील भावना आहे.बऱ्याच शिक्षकांनी तंबाखू विषयांशी संबंधीत निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, पथनाट्य, विज्ञान प्रदर्शन अशा विविध उपक्रमातून सदर समस्येला लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना तंबाखूच्या दुष्परिणामांची आणि तंबाखू सेवन सोडण्याच्या प्रक्रियेची माहिती देण्यात आणि सुदृढ, सक्षम निरोगी भारत बनविण्यासाठी शिक्षक एक आशेचा किरण आहे. त्यासाठी शिक्षकांकडून या उपक्रमाअंतर्गत प्रयत्नही केले जात आहेत. (वार्ताहर)
तंबाखुमुक्त जीवन जगल्यास आरोग्य सुदृढ राहील
By admin | Updated: October 8, 2014 23:24 IST