एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा डोलारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:24 PM2018-05-19T23:24:41+5:302018-05-19T23:25:04+5:30

बल्लारपूर तालुक्यात विसारपूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १५ हजारावर आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हास्तरावर अधिकाऱ्याचा प्रभार सोपविला.

The health center on the same medical officer | एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा डोलारा

एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आरोग्य केंद्राचा डोलारा

googlenewsNext
ठळक मुद्देविसापूर आरोग्य केंद्रातील प्रकार : रुग्णाच्या तुलनेत डॉक्टरची कमतरता

अनेकश्वर मेश्राम।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : बल्लारपूर तालुक्यात विसारपूर सर्वात मोठे गाव असून लोकसंख्या १५ हजारावर आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती आहे. येथील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हास्तरावर अधिकाऱ्याचा प्रभार सोपविला. दरम्यान कंत्राटी पद्धतीने एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची येथे नेमणूक करण्यात आली. त्यांच्या करार संपुष्टात आल्याने विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा भार आता एकाच वैद्यकीय अधिकाºयावर आला आहे. यामुळे येथे रुग्णाच्या तुलनेत डॉक्टरची कमतरता भासत आहे.
विसापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत नांदगाव (पोडे), शिवणी व चुनाभट्टी उपकेंद्राचा समावेश आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनील कुकडपवार यांना जिल्हा स्तरावर हिवताप अधिकारी म्हणून वर्षभरापासून पदभार सोपविण्यात आला. दरम्यान डॉ. सुकेशनी कांबळे यांची अकरा महिन्यासाठी येथील आरोग्य केंद्रात नेमणूक करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ नुकताच संपला. परिणामी सर्व आरोग्य केंद्राचा भार येथील डॉ. अश्विनी बेले यांच्यावर आला. येथील आरोग्य केंद्रात बाह्यरुग्णांची संख्या दररोज १५०-२०० च्या आसपास असल्याने एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर जबाबदारी आल्याने गावकºयात संताप व्यक्त केला जात आहे. येथील आरोग्य केंद्राची इमारत अद्यावत व सर्व सुविधायुक्त झाल्याने गरीब व गरजू रुग्णांचा उपचारासाठी ओढा वाढला आहे. महिलांना प्रसुतीगृहाची सुविधा झाल्यामुळे प्रसुतीसाठी महिला येतात. अशातच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान नसल्यामुळे मुख्यालयी राहणे अडचणीचे ठरले आहे. रुग्णांना प्रथमोपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जि. प. आरोग्य प्रशासनाने येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेवून दोन वैद्यकीय अधिकारी नियमीत सेवा देण्यासाठी नियुक्त करणे क्रमप्राप्त झाले आहे.

विसापूर येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनील कुकडपवार यांच्यावर जिल्हा हिवताप अधिकारी म्हणून तात्पुरता प्रभार जिल्हा आरोग्य प्रशासनाने सोपविला आहे. यामुळे आजघडीला डॉ. अश्विनी बेले यांनाच आरोग्य केंद्राचा भार पेलावा लागत आहे. वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाल्यास नियमीत दोन वैद्यकीय अधिकारी रुग्णांच्या सेवेत रुजू होतील.
- डॉ. प्रकाश नगराळे, तालुका वैद्यकीय अधिकारी बल्लारपूर
विसापूर आरोग्य केंद्रात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. रुग्णांची संख्या अधिक असल्याने दोन वैद्यकीय अधिकारी नियमीत सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरतात. येथे रुग्णांची हेळसांड होवू नये म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. आरोग्य विभाग सकारात्मक निर्णय लवकरच घेणार.
- गोविंदा पोडे, सभापती, पंचायत समिती, बल्लारपूर

Web Title: The health center on the same medical officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.