शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

त्याने अंगालाच गुंडाळल्या दारूच्या ३७ बाटल्या, चंद्रपूर, वर्धामध्ये होते दारुची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 14:15 IST

दारूबंदी असलेल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारूची तस्करी होते.

नागपूर - दारूबंदी असलेल्या चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दररोज मोठ्या प्रमाणात परराज्यातून दारूची तस्करी होते. त्यासाठी आरोपी वेगवेगळ्या शक्कल लढवतात. शनिवारी दुपारी आरपीएफच्या नजरेतून वाचण्यासाठी एका आरोपीने चक्क शरीरालाच दारुच्या ३७ बॉटल गुंडाळून प्रवासाचा बेत आखला. परंतु नागपुरात गाडी येताच आरपीएफच्या जवानांनी त्यास शोधून ताब्यात घेतले.

भैय्या साठे (५२) रा. सिद्धार्थनगर, बल्लारशा, जि. चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. तो रेल्वेगाडी क्रमांक १२६८८ डेहरादून-मदुराई एक्स्प्रेसच्या मागील जनरल कोचमधून प्रवास करीत होता. ही गाडी दुपारी १२ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर येताच आरपीएफचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, विकास शर्मा, उषा तिग्गा यांनी त्याची तपासणी केली असता त्याने शरीरालाच दारुच्या बॉटल सेलो टेपच्या साह्याने गुंडाळल्याचे लक्षात आले. 

लगेच त्यास अटक करून आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात दारुची तस्करी करण्यासाठी आरोपी नानाविध शक्कल लढवित असून यापूर्वीही तस्करांनी कपड्याचे बॉक्स, प्रसाधनगृह, महिलांचा वापर करणे, मिठाई बॉक्स, महाविद्यालयीन तरुणी आदींच्या माध्यमातून दारूची तस्करी केल्याचे उघड झाले आहे. वर्षभरात अशा पद्धतीने तस्करी करण्यात येणा-या लाखो बॉटल्स आरपीएफने पकडल्या आहेत.