शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

अजगराच्या तोंडातून पाय सोडवून घेत 'त्याने' वाचवले स्वतःचे प्राण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2022 07:45 IST

Chandrapur News चिरादेवी तलावात शिंगाडा आणि मच्छीमारीसाठी गेलेल्या व्यक्तीला अचानक अजगराने पायापासून गिळण्याचा प्रयत्न केला. मोठ्या हिमतीने त्याचा जबडा दोन्ही हाताने ताणून पाय बाहेर काढत त्या व्यक्तीने आपले प्राण वाचविले.

ठळक मुद्देमदतीसाठी कुणी नसताना एकटाच लढला ‘राजू’

विनायक येसेकर

चंद्रपूर : चिरादेवी तलावात शिंगाडा आणि मच्छीमारीसाठी गेलेल्या व्यक्तीला अचानक अजगराने पायापासून गिळण्याचा प्रयत्न केला. मोठ्या हिमतीने त्याचा जबडा दोन्ही हाताने ताणून पाय बाहेर काढत त्या व्यक्तीने आपले प्राण वाचविले. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली. बचावलेल्या व्यक्तीवर वैद्यकीय उपचार सुरू आहे.

राजू कवडू पचारे (४६) रा. झिंगुजी वॉर्ड भद्रावती असे बचावलेल्या युवकाचे नाव आहे. राजू हा नेहमीप्रमाणे बुधवारी ११ वाजता घरून चिरादेवी तलावाकडे गेला व त्यानंतर हवा भरलेल्या ट्यूबच्या साहाय्याने पाण्यात उतरला. पाण्यामध्ये मच्छीमारीसाठी जाळे टाकल्यानंतर तो तलावातील मध्यभागी वेलातील शिंगाडा तोडत असताना अचानक तेथे असलेल्या बारा फूट लांबीच्या अजगराने राजूचा डावा पाय पकडला. त्यामुळे अजगराचे दात हे पायात घुसले. त्यामुळे राजू हा वेदनामय व भयभीत झाला. त्याने आरडाओरड केली. मात्र त्याच्या मदतीला तिथे कोणीच आले नाही. अशा परिस्थितीत त्याने हिमतीने अजगराच्या शेपटीवर उजवा पाय ठेवून नंतर दोन्ही हाताने त्याचा जबडा ताणला. आपला डावा पाय बाहेर काढला. तेव्हा तिथे पाण्यामध्ये रक्ताच्या धारा लागल्या होत्या. तिथेच त्याने त्या अजगराला पाण्यात पाडले व कसाबसा तलावाच्या बाहेर निघाला.

जखमी अवस्थेतच पोहोचला रुग्णालयात

अजगराच्या तावडीतून सुटून तो कसाबसा तलावाबाहेर तर आला. मात्र तिथेही कुणी नव्हते. जखमी अवस्थेत तो मोठ्या हिमतीने आपल्या दुचाकीने भद्रावती गाठून शिंदे हॉस्पिटल येथे स्वत:च उपचारासाठी दाखल झाला. डॉक्टरांनी त्याला त्या अजगराबाबत विचारणा केल्यानंतर त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू केला. सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून तो उपचार घेत आहे. त्याच्या या हिमतीने सर्वत्र त्याचे कौतुक करण्यात येत आहे.

टॅग्स :Jara hatkeजरा हटके