शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
2
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
3
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
4
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
5
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
6
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
7
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
8
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
9
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
10
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
11
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
12
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
13
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
14
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
15
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
16
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मनोज जरांगेंसोबत उद्धव ठाकरेंनी फोनवरून साधला संवाद
17
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले
18
'ट्रम्प यांच्या टॅरिफ'ला धक्का बसणार ! जपानमधील मेगा डीलनंतर पंतप्रधान मोदी चीनला पोहोचले
19
रात्री गाढ झोपले, सकाळी मृतदेह बाहेर काढले; भूस्खलनात आई-वडिलांसह ५ मुलांचा मृत्यू
20
Nagpur Girl Stabbed: एका दिवसाची आईची साथ सुटली अन् एंजेल नेहमीसाठीच दुरावली!

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर महापौर चषकाचा मानकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 22:50 IST

चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा रंगतदार समारोप नाशिकचा हर्षवर्धन सदगीरविरुद्ध मुंबईचा सतीश फडतरे या दमदार रोमांचकारी लढतीने झाला. मॅटवरील कुस्तीत रविवारी सायंकाळी झालेल्या खुल्या वजनी गटात मुंबईच्या सतीश फडतरेवर दणदणीत विजय मिळवत हर्षवर्धन सदगीर याने नाशिकसाठी विजेतेपद पटकावले.

ठळक मुद्देकुस्ती स्पर्धा : महिला गटात भाग्यश्री फंड विजयी, विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा रंगतदार समारोप नाशिकचा हर्षवर्धन सदगीरविरुद्ध मुंबईचा सतीश फडतरे या दमदार रोमांचकारी लढतीने झाला. मॅटवरील कुस्तीत रविवारी सायंकाळी झालेल्या खुल्या वजनी गटात मुंबईच्या सतीश फडतरेवर दणदणीत विजय मिळवत हर्षवर्धन सदगीर याने नाशिकसाठी विजेतेपद पटकावले.चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित केला जाणाऱ्या महापौर चषक कुस्ती स्पर्धेच्या लढती मोठ्या जल्लोषात पार पडतात. यावेळी ८ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारीदरम्यान कुस्ती स्पर्धा कोहिनूर क्रीडांगण येथे प्रेक्षकांच्या उत्साहात पार पडली. राज्यभरातून या दोन दिवसीय कुस्ती स्पर्धेसाठी तीनशेवर मल्लांनी सहभाग नोंदवला. तर हजारो कुस्तीप्रेमींना रोमांचकारी सामन्यांची पर्वणीच या निमित्ताने अनुभवायला मिळाली.या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, लातूर, मुंबई, अहमदनगर, औरंगाबाद तसेच विदर्भातील पुरुष व महिला खेळाडू सहभागी झाले होते. पुरुष गटात ७० किलो गटात मूंबईचा सर्वेश यादव प्रथम असून ६५ किलो गटात प्रथम लातूरचा महेश तातपुरे, ६१ किलो गटात प्रथम गोविंद कपाटे, ५७ किलो गटात प्रथम राहुल कसारे, ५० किलो गटात प्रथम पंकज पाटील, ४५ किलो गटात प्रथम निखिल चौधरी, ४० किलो गटात प्रथम आकाश गड्डे, ३५ किलो गटात प्रथम अभिजीत ठानगे विजेते ठरले. तर महिला गटात ५३ किलो गटात अहमदनगरची धनश्री फंड विजेती ठरली असून इतर गटात, ४८किलो गटात प्रथम रेश्मा शेख, चंद्रपूर , ४४ किलो गटात प्रथम अंजली शाम, नागपूर, ४० किलो गटात प्रथम प्रियांका भोयर, चंद्रपूर, ३५ किलो गटात प्रथम वृषाली झंझाड, भंडारा विजेते ठरले. पंच म्हणून आनंद गायकवाड, रणवीरसिंह रावल, रामदास वडीचार, शरद टेकुलवार, छगनदेव पडगेलवार, धर्मशील कातकर, सुहास बनकर, अब्दुल फैझ काजी, नामदेव राऊत, विवेक बुरडकर, शुभांगी मेश्राम, शाम राजूरकर, मुरलीधर टेकुलवार, वैभव पारशिवे, कुणाल वडीचार यांनी काम पाहिले. स्पर्धेत विजयी पुरुष मल्लाला महापौर चषक, ७१,००० रुपयांचे रोख पारितोषिक व चांदीची गदा तसेच महिला विजेत्या मल्लाला महापौर चषक ३५,००० रुपयांचे रोख पारितोषिक व चांदीची गदा देण्यात आली. बक्षीस वितरण प्रसंगी महापौर अंजली घोटेकर, स्थायी समिती सभापती राहुल पावडे, उपायुक्त गजानन बोकडे , नोडल अधिकारी विजय देवळीकर, गटनेते वसंत देशमुख, भारतीय पारंपरिक कुस्ती संघाचे विदर्भ उपाध्यक्ष रघुवीर अहीर, मोहन चौधरी उपस्थित होते.