शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
2
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
3
वायकर, EVM ओटीपी मोबाईल प्रकरणावर निवडणूक आयोग थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार
4
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
5
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
6
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
7
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
8
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
9
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
10
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
11
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
12
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
13
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
14
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
15
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
16
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
17
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण
18
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
19
Rishabh Pant : मोठ्या मनाचा रिषभ पंत! 'ती' सर्व कमाई दान करणार; चाहत्यांना दिले वचन
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!

महामानवाला अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 11:53 PM

‘बाबासाहेब अमर रहे’, ‘युध्द नको बुध्द हवा, सुख शांतीचा मार्ग नवा’ आदी घोषणा देत हजारो आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

ठळक मुद्देअस्थिकलश यात्रा : विविध भागातून निघाली रॅली

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ‘बाबासाहेब अमर रहे’, ‘युध्द नको बुध्द हवा, सुख शांतीचा मार्ग नवा’ आदी घोषणा देत हजारो आंबेडकरी अनुयायांनी बुधवारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, रिपब्लिकन पक्ष, डॉ.बाबासाहेब आंबेडकर शत्तकोतर जयंती महोत्सवाच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलशाची यात्रा काढण्यात आली. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवनातून निघालेली ही यात्रा कस्तुरबा मार्गाने गिरनार चौक, गांधी चौक येथून मार्गक्रमण करून डॉ बाबासाहेब यांच्या पुतळ्यापर्यंत पोहचली. तिथे बाबासाहेबांचे अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.त्यानंतर शहरातील विविध भागातून आंबेडकरी अनुयायी रॅलीच्या रुपात डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याजवळ पोहचले. रॅलीतील प्रत्येक आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांच्या अस्थिचे दर्शन घेऊन अभिवादन करीत होता. विविध संघटनांकडून पुतळ्याला मालार्पण केल्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.दुर्गापुरातून निघाली महारॅलीपंचशील बौध्द विहार, भीमनगर, वॉर्ड क्रमांक ४, दुर्गापूर अंतर्गत बुधवारी संयुक्त रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये उर्जानगर वसाहत, डब्ल्यु.सी.एल. शक्तीनगर, दुर्गापूर, तुकुम, सिनाळा, मसाळा, वरवट, चोरगांव, पदमापूर, किटाळी, भटाळी, पायली, विचोडा, खैरगाव या सर्व ग्रामीण भागातील एकुण ७० बौध्द मंडळे व सामाजिक संघटनांचा सहभाग होता. सदर रॅलीची सुरूवात खुलेरंगमंच, उर्जानगर वसाहतीतून करण्यात आली. मुख्य मार्गाने जटपुरा गेट ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ पोहचली.काँग्रेसतर्फे आदरांजलीकाँग्रेसचे नेते माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहिली. यावेळी गजानन गावंडे, डॉ. सुरेश महाकूळकर, नगरसेवक अशोक नागापुरे, प्रशांत दानव, देवेंद्र बेले, संगिता भोयर, प्रवीण पडवेकर, चंद्रशेखर पोडे आदी उपस्थित होते.