शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
2
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
3
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
4
अनंत अंबानी-राधिक मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
5
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
10
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
11
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
12
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
13
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
14
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
15
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
16
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
17
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
18
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
19
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

कापूस उत्पादकांना सानुग्रह अनुदान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 10:44 PM

यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने कापूस उत्पादनात घट झाली त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना एकरी तीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

ठळक मुद्देराष्ट्रवादी काँग्रेसची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : यावर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने कापूस उत्पादनात घट झाली त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. त्याकरिता चंद्रपूर जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकºयांना एकरी तीस हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.रोखीचे पीक म्हणून शेतकरी कापूस पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करतात. कापूस विकल्यानंतर शेतकरी वर्षाचे आर्थिक नियोजन करीत असतात. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, कोरपना, राजुरा, भद्रावती, जिवती, चंद्रपूर, चिमूर आदी तालुक्यात कापसाचा पेरा मोठ्या प्रमाणात राहतो. यावर्षी अनेक शेतकºयांना कपाशीची दुबारा पेरणीही करावी लागली. अशा परिस्थितीत काही प्रमाणात वाढलेल्या झाडांना मध्येच दडी मारलेल्या पावसाचा फटका बसला. त्यातच हंगामाच्या सुरवातीला झालेल्या अल्पशा पाऊस झाल्यानंतर वातावरणात काही काळ उकाडा आल्याने एका वेचनीनंतर कापूस निघणे बंद झाले. त्यामुळे शेतकºयांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना बियाने मशागत आदीकरिता लागलेला खर्चही निघणार नाही.त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा व कापूस उत्पादक शेतकºयांना एकरी तीस हजार रुपये अनुदान देण्याची मागणी निवेदनातून केली आहे.जिल्हाधिकाºयांना निवेदन देणाºया शिष्ठमंडळात विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मो. वि. टेमुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष संदीप गड्डमवार, राकाँप्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी ओबीसी सेल राज्य उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, जिल्हा ओबीसी सेल अध्यक्ष नितीन मत्ते, निकीत भटारकर, ज्योती रंगारी, राजीव कक्कड, सुरेश रामगुंडे, सरपंच विशाल पारखी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.