महाकाली यात्रेसाठी भाविकांचे जत्थे चंद्रपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 10:34 PM2019-04-12T22:34:13+5:302019-04-12T22:34:58+5:30

चंद्र्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा गुरुवारपासून सुरु झाली आहे. चंद्रपुरातील महाकाली सर्वत्र पचलित असल्याने राज्यभरातील भाविकांचे जत्थे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. मंदिर परिसरात भाविकांसाठी १८ हजार स्क्वेअर फुटाचा मंडप टाकण्यात आला आहे.

Grandmother's granddaughter goes for Mahakali Yatra | महाकाली यात्रेसाठी भाविकांचे जत्थे चंद्रपुरात

महाकाली यात्रेसाठी भाविकांचे जत्थे चंद्रपुरात

Next
ठळक मुद्देमहाकाली यात्रा महोत्सव : भाविकांसाठी १८ हजार चौरस फुटांचा मंडप

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्र्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा गुरुवारपासून सुरु झाली आहे. चंद्रपुरातील महाकाली सर्वत्र पचलित असल्याने राज्यभरातील भाविकांचे जत्थे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागत आहेत. मंदिर परिसरात भाविकांसाठी १८ हजार स्क्वेअर फुटाचा मंडप टाकण्यात आला आहे. त्यासोबतच यात्रा परिसरात मोठ्या प्रमाणात दुकाने सजली आहेत.
चंद्रपूरची महाकाली देवी विदर्भासह मराठवाडा आणि आंध्र प्रदेशात प्रसिद्ध आहे. नवसाला पावणारी महाकाली अशी तिची ख्याती आहे. त्यामुळे तिचे भक्त चंद्रपूरच्या तापनामाची आणि उन्हाची पर्वा न करता एप्रिल महिन्यात होणाऱ्या यात्रेला दरवर्षी येत असतात. यावर्षीदेखील मराठवाडा आणि आंध्र प्रदेशातील भक्तांची गर्दी वाढू लागली आहे. ट्रक, मेटॅडोर अथवा मिळेल त्या वाहनाने भाविक बुधवारपासून दाखल होत आहेत. यात्रेकरूंच्या वाढत्या गर्दीनुसार यात्रेमध्ये दुकाने सजू लागली आहेत. झरपट नदीच्या काठावर असलेल्या महाकाली मंदिरात ही यात्रा सुरू झाली आहे. त्याकरिता झरपट नदीमध्ये स्वच्छता अभियान राबवून तिचे पात्र स्वच्छ करण्यात आले. बाहेर गावावरून येणारे भक्त महिला व पुरुष तेथे आंघोळ करीत आहेत.
भक्तांच्या निवासाकरिता मंदिराच्या आतील परिसरात दोन मोठे लोखंडी शेड तयार करण्यात आले आहेत. शिवाय, मंदिराच्या आवारात १८ हजार स्केअर फु टाचा मंडप टाकण्यात आला. तसेच धर्मशाळा आणि मंदिरासमोरील मैदानात भाविकांनी निवासस्थाने उभारली असून शेकडो भाविक महिनाभर मुक्कामी राहुन धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची तयारी करीत आहेत.

देवीच्या दुप्पट्याला विशेष मागणी
यात्रेसाठी येणारी गर्दी बघून याठिकाणी अनेक दुकाने थाटली आली. यामध्ये देवीच्या नावाचे दुप्पटे आहेत. युवावर्गाकडून या दुप्पट्याला विशेष मागणी असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. त्यासोबत गॉगल व इतर वस्तूही ते खरेदी करत असल्याचे सांगितले.
विविध दुकाने सजली
महाकाली देवी दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे याठिकाणी विविध प्रकारचे दुकाने सजली असून भाविकही मोठ्या प्रमाणात खरेदी करताना दिसून येत आहे. पुजा करताना देवीला कुंकू, गुलाल वाहण्यात येऊन नारळ फोडण्यात येतो. कुंकू, गुलाल, बुक्का, नारळ, मिठाईची दुकाने मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
नवसाला पावणारी महाकाली अशी या महाकाली देवीची ख्याती असल्याने येथील देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा मूहूर्त साधून झरपटच्या पात्रात पवित्र स्रान करण्याची देवी महाकालीच्या भक्तगणांची परंपरा आहे. या स्रानानंतर दर्शनाच्या रांगेत लागून दर्शन घेण्यासाठी त्यांची लगबग असते. कुटुंबातील बायकापोरांसह आणि वृद्धांसह आलेलेही अनेक जण यात सहभागी असतात. दर्शनासाठी गोंदड होऊ नये, म्हणून प्रशासनाने बॅरिगेट्स लावले आहेत. त्यामुळे भक्तही रांगेमध्ये लागून दर्शन घेत आहेत.

पोतराज वेधत आहेत लक्ष
येथील महाकाली देवीने दूरवरच्या भक्तांना वेड लावले आहे. या यात्रेत पोतराज लक्षवेधक ठरत आहे. ते येथे येणाºया भाविकांचे मनोरंजन करून आपली उपजीविका करीत आहेत. तसेच गोंधळी लोकनृत्य व गीत सादर करून मनोरंजन करीत आहेत. नवयुवक या पोतराजसोबत सेल्फी काढताना दिसून येत आहेत.

Web Title: Grandmother's granddaughter goes for Mahakali Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.