शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शासन निर्णयाने वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 14:44 IST

राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २०१२-१३ मध्ये एक शासन निर्णय निर्गमीत केला होता. त्या निर्णयाची चालू सत्रापासून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देपाच टक्के आरक्षणाचा फटका२०१२-१३ च्या निर्णयाची आता अंमलबजावणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने २०१२-१३ मध्ये एक शासन निर्णय निर्गमीत केला होता. त्या निर्णयाची चालू सत्रापासून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नव्या शैक्षणिक सत्रात मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी केवळ पाच टक्के आरक्षण ठेवण्यात आल्याने ओबीसी विद्यार्थ्यांना आता वसतिगृहाची दारे बंद झाली आहेत.राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या अधिपत्याखाली २७१ वसतिगृहे सुरू आहेत. जिल्हास्तरावर नव्याने १०० व विभागीयस्तरावर सात वसतिगृहे नव्याने सुरु करण्यात आली आहेत. या वसतिगृहात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याबाबत वेळोवेळी नियमावली तयार करण्यात आली आहे. यात सर्व स्तरावर सुरू असलेल्या व भविष्यात सुरु होणाऱ्या सर्व शासकीय मागासवर्गीय वसतिगृहात यापुढे ओबीसी मुलामुलींना केवळ पाच टक्के आरक्षण निश्चित केले आहे.एका वसतिगृहात २०० ते २५० विद्यार्थी या प्रवर्गाचे अर्ज करीत असतील तर त्यापैकी केवळ दोन ते तीन विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळणार आहे. मग अन्य विद्यार्थ्यांनी कुठे राहुन शिक्षण घ्यावे, असा प्रश्न त्यांच्या समोर निर्माण झाला आहे. हा निर्णय इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षणात अडसर बनला आहे.सदर शासन निर्णय २०१२-१३ या शैक्षणिक वर्षापासून अंमलात आणण्याचे आदेश निर्गमीत करण्यात आले होते. परंतु, त्यांची अंमलबजावणी न केल्याने इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आजपर्यंत वसतिगृहात प्रवेश मिळत होता. परंतु, हा शासन निर्णय जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाने या वर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून सक्तीचे करण्याचे आदेश दिल्याने इतर मागासवर्गीय मुला, मुलींनी कसे शिक्षण घ्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी