शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
4
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
5
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
6
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
7
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
8
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
9
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
10
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
11
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
12
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
13
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
14
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
15
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
17
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
18
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
19
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
20
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू

१६ जूनपासून सुरू होणार गोंडवाना विद्यापीठाची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 05:01 IST

विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी १० सदस्यीय समन्वय समिती गठित केली होती. या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परीक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचीच परीक्षा घेतली जाणार आहे.

ठळक मुद्देवेळापत्रक जाहीर : नवीन शैक्षणिक वर्षे १ सप्टेंबरपासून सुरू करण्याची तयारी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या टाळेबंदीमुळे गोंडवाना विद्यापीठाच्या रखडलेल्या पदविका, पदवीपूर्व व पदव्युत्तर अंतिम परीक्षा व त्यांच्या अनुशेष परीक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यामुळे १५ ऑगस्टपर्यंत सर्व परीक्षांचे निकाल लावण्यात येणार आहेत. शैक्षणिक वर्षे २०२०-२१ प्रथम वर्ष १ सप्टेंबर आणि इतर सर्व अभ्यासक्रमासाठी १ ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे.विद्यापीठाच्या परीक्षा व शैक्षणिक वर्ष सुरू करण्यासाठी कुलगुरूंनी १० सदस्यीय समन्वय समिती गठित केली होती. या समितीने धोरणात्मक निर्णय घेवून परीक्षा १६ जून ते ३१ जुलै या कालावधीत घेण्याचा निर्णय घेतला आहे. दोन, तीन, चार व पाच वर्षीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचीच परीक्षा घेतली जाणार आहे. उच्च शिक्षण संचालक पुणे यांच्या पत्रानुसार गोंडवाना विद्यापीठाने नियमित विद्यार्थ्यांची उन्हाळी सत्र २०२० ची परीक्षा घेण्यात येणार नसून विद्यार्थ्यांना ५० टक्के ग्रेड अंतर्गत मूल्यमापनावर व ५० टक्के गुण मागील सत्रातील परिक्षेच्या सरासरी गुणावरून ठरवल्या जाणार आहेत. तशा प्रकारच्या गुणपत्रिका विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत.अंतर्गत मूल्यमापनाचे गुण हे विषयाचे निरंतर मूल्यमापन, सत्र पूर्वपरीक्षा व सत्रात परीक्षा या आधारावर घेण्यात येणार आहे. त्यामुळे महाविद्यालयाने घेतलेल्या परिक्षेच्या उत्तरपत्रिका व निरंतर मूल्यमापनाच्या राबविलेल्या प्रक्रियेचे सर्व दस्तावेज सीलबंद करून जतन ठेवावे लागणार आहे. विद्यापीठाने मागणी केल्यानंतर सदर दस्तावेज विद्यापीठास द्यावे लागणार आहे. विद्यापीठाद्वारे दिलेले गुण एखाद्या विद्यार्थ्याला मान्य नसल्यास अशा विद्यार्थ्याला प्राप्त श्रेणीमध्ये सुधारणा करावयाची असल्यास हिवाळी २०२० परिक्षेमध्ये परीक्षा आवेदनपत्र भरून परीक्षा देता येईल. त्या परिक्षेत प्राप्त गुण अंतिम समजण्यात येईल, अशी माहिती गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी दिली.लॉकडाऊन कालावधी ‘उपस्थिती’ म्हणून ग्राह्यजे विद्यार्थी पुढील सत्राच्या प्रवेशापासून वंचित झाले असतील व शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये नियमित प्रवेश नाहीत, अशा सर्व विद्यार्थ्यांना कॅरी फॉरवर्ड पद्धतीने शैक्षणिक सत्र २०२०-२१ मध्ये प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. ही सुविधा फक्त विद्यमान शैक्षणिक वर्षासाठीच आहे. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, अशा सर्वांकरिता लॉकडाऊन कालावधी हा उपस्थिती म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.१५ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीरविद्यापीठाद्वारे आयोजित परीक्षा विद्यापीठाच्या अभ्याक्रमावरच आधारीत राहील. आचार्य व एमफील विद्यार्थ्यांची मौखिक चाचणी परीक्षा व्हीडीओ कॉन्फन्सिंद्वारे होईल. आचार्य व एमफिल विद्यार्थ्यांना त्यांचे शोधप्रबंध, प्रबंधिका ३१ डिसेंबर २०२० पर्यंत सादर करावा लागणार आहे. महाविद्यालय तात्पुरत्या स्वरूपात १५ जूनपासून सुरू होतील. सर्व उपक्रमांच्या पूर्वतयारीचा कालावधी ३० जूनपर्यंत असेल. पदविका, पदवीपूर्व व पदव्युत्तर अंतिम परीक्षा वगळून सर्व परिक्षांचे निकाल १५ जुलैपर्यंत जाहीर होणार आहेत.

टॅग्स :universityविद्यापीठexamपरीक्षा