शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गोंडराणी हिराईची विकासदृष्टी पे्ररणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 23:51 IST

राणी हिराईने चंद्रपुरात देवी महाकालीचे भव्य व सुंदर मंदिर बांधले. सोबतच, महाकाली यात्रा सुरु केली. ती यात्रा आजतागायत सुरु आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व असे विविधांगी गुण राणी हिराई यांच्या ेअंगी होती.

ठळक मुद्देमहाकाली यात्रेनिमित्त : धार्मिक कार्यासोबतच विकासकामांना दिली चालना

वसंत खेडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : राणी हिराईने चंद्रपुरात देवी महाकालीचे भव्य व सुंदर मंदिर बांधले. सोबतच, महाकाली यात्रा सुरु केली. ती यात्रा आजतागायत सुरु आहे. कर्तृत्व, नेतृत्व आणि मातृत्व असे विविधांगी गुण राणी हिराई यांच्या ेअंगी होती. घडाडी आणि बुद्धी चातुर्याने चंद्रपूरचा राज्यकारभार त्यांनी यशस्वीपणे सांभाळला. त्यांची कारकिर्द भरीव आणि महिलांना अभिमान वाटावा अशी की राणी लक्ष्मीबाई आणि अहिल्याबाई होळकर यांच्यासारखाच त्यांचा गौरवाने उल्लेख व्हावा!चंद्रपूर- बल्लारपूरचा भाग सुमारे ६०० वर्षे गोंडराजांच्या अधिपत्याखाली होता. या कालावधीत २३ राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई या एकमेव महिला शासक होत्या. त्यांची कारकिर्द केवळ १५ वर्षांची पण, या अल्पशा काळात युद्धात स्वत: उतरुन त्यांना शत्रुशी मुकाबला करावा लागला होता. राणीचे माहेर मध्य प्रदेशातील होशंगाबाद जवळचे! वडिल सरदार असल्याने राजकारण आणि युद्धाचे धडे त्यांना बालपणापासूनच मिळाले होते. त्यांचा विवाह चंद्रपुरातील बिरशहाशी झाला. वडिलाच्या निधनानंतर बिरशाह गादीवर बसला. परंतु थोड्याच दिवसानंतर एकाने विश्वासघात करुन त्यांची हत्या केली. या दाम्पत्याला वारसा नसल्याने हिराईने आपल्या नात्यातील रामशहा या सहा वर्षीय मुलाला दत्तक घेऊन गादीवर बसविले आणि आत्मविश्वासाने राज्यकारभार बघू लागली. कान्होजी भोसले यांनी १७१० ला चंद्रपूरवर स्वारी केली. गोंड आणि पठाण सैन्य घेऊन रात्री मैदानात उतरली. तेथे कान्होजीचा पराभव झाला. यानंतर सुलतानजी निंबाळकर याने चंद्रपूरवर स्वारी केली. चंद्रपूरची आर्थिक स्थिती वाईट होती. त्यामुळे राणीने युद्ध न करता तह केला. परंतु, दुसऱ्याच वर्षी निंबाळकरला चंद्रपूर सोडून देण्याला भाग पाडले. राणीला जय-पराजयाला सामोरे जावे लागले होते. परंतु, हिंमत हरली नाही. लोककल्याणकारी कामे करून राणीने ठसा उमठविला. ऐतिहासिक रामाळा तलाव बांधले. राजाची देखणी समाधी व महाकाली मंदिर बांधले. राज्यावर औरंगजेबाचा अंमल होता. तरीही तिने गोवंश हत्याबंदी केली. रामशहा हा लहान असल्याने त्याचा मातेसारखा सांभाळ करून युद्ध व राजकारणाचे प्रशिक्षण दिले. राजा म्हणून उत्तमरित्या संस्कारीत केले. राणी हिराई धार्मिक वृत्तीची होती. माता महाकालीवर तिची प्रगाढ श्रद्धा होती....अन् मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण केलेराणी हिराईने चंद्रपूरला महाकाली देवीचे लहान मंदिर होते. बिरशहा हा एका युद्धात शंभूशी लढत असताना त्याचा पराभव नजिक दिसून येत होता. अशाप्रसंगी राणी हिराईने देवीची आराधना करीत पतीला युद्धात विजय मिळवून दिला. मोठे मंदिर बांधण्याचे मनाशी ठरविले. बिरशहाने युद्ध जिंकले व राणीने माता महाकालीचे मंदिर बांधले. यात्रा भरविणे सुरु केले. शेकडो वर्षांपासून ही यात्रा भरत आहे. महाकाली देवीच्या महात्म्याची प्रसिद्धी नांदेडपर्यंत पोहोचली. तेथील भािवक यात्रेदरम्यान दर्शनासाठी येऊ लागले. पोतराजे आणि भाविकांमुळे यात्रेला गर्दी उसळते. ४०-५० वर्र्षांपूर्वी मंदिराभोवतीचा बराचसा भाग मोकळा होता. त्यामुळे रात्री भरपूर जागा मिळायची. मात्र, आज घरे झाल्यामुळे यात्रेकरिता कमी जागा उरली आहे. पण यात्रेचे महत्त्व कमी झाले नाही.राणी हिराईचा पुतळा उभाराराणी हिराईने केलेल्या लोककल्याणकारी कार्याची दखल इतिहासाने घेतली आहे. त्यांच्या कार्यकाळातील विविध बांधकाम आजही साक्ष म्हणून उभे आहे. त्यांच्या कार्याचा म्हणावा तसा गौरव झाला नाही. त्यांच तेजस्वी इतिहास लोकांना अद्याप योग्यरित्या कळला नाही. महाकाली मंदिरात राणी हिराईचे चित्र लावण्यात आले आहे. यात्रेदरम्यान अंचलेश्वर गेटजवळ राणीचे चित्र लावले जातात. पण, हे पुरेसे नाही. चंद्रपुरात राणी हिराईचा पुतळा उभारला पाहिजे.