सोशल मीडियावरच मित्रांनी गुंफले सोनेरी क्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:08+5:30

दरवर्षी शाळा महाविद्यालयांमध्ये मैत्रीदिनी मोठा जल्लोष असायचा. मात्र कोरोनामुळे अद्यापही शाळा महाविद्यालय सुरु झाले नाही. त्यामुळे मैत्रीचे आणि महाविद्यालयाचे कट्टे सुनेसुने तर मॉल्स आणि चित्रपटगुहात होणारी गर्दी यावर्षी दिसली नाही. हॉटेल्स आणि कॅफेमध्ये पार्सल घेण्यासाठी काही प्रमाणात गर्दी होती.

Golden moments were shared by friends on social media | सोशल मीडियावरच मित्रांनी गुंफले सोनेरी क्षण

सोशल मीडियावरच मित्रांनी गुंफले सोनेरी क्षण

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोनाचा फटका : दरवर्षीच्या गर्दीच्या ठिकाणी होती पोलिसांची नजर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मैत्रीचा आनंद साजरा करण्याचा दिवस म्हणजे मैत्रीदिन. दरवर्षी चंद्रपूर जिल्ह्यात मैत्रीदिन मोठ्या हर्षोउल्हासात साजरा करण्यात येत होता. मात्र कोरोनामुळे यावर्षी सर्व युवावर्गांना केवळ सोशल मीडियावरच मैत्रीदिन साजरा करावा लागला. जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर जल्लोषात साजरा होणारा सण केवळ सोशल मीडियावर एकमेकांना मैत्रीदिनाच्या शुभेच्छा देत अनेकांनी छायाचित्र, व्हिडीओ आणि खास संदेश पोस्ट करत मित्रांबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला.
दरवर्षी शाळा महाविद्यालयांमध्ये मैत्रीदिनी मोठा जल्लोष असायचा. मात्र कोरोनामुळे अद्यापही शाळा महाविद्यालय सुरु झाले नाही. त्यामुळे मैत्रीचे आणि महाविद्यालयाचे कट्टे सुनेसुने तर मॉल्स आणि चित्रपटगुहात होणारी गर्दी यावर्षी दिसली नाही. हॉटेल्स आणि कॅफेमध्ये पार्सल घेण्यासाठी काही प्रमाणात गर्दी होती.
दरवर्षी मैत्रीदिनाला लहान मुले आणि तरुण एकमेकांना फ्रेंडशीप बँड बांधून शुभेच्छा देतात. यानिमित्त हॉटेल्स, कॅफे, महाविद्यालयाचे कट्टे, मॉल्स आणि चित्रपटगृह गर्दीने फुलत होती. पण यंदा लॉकडाऊनमुळे काहींनी व्हिडिओ कॉल आणि सोशल मीडियाद्वारे मित्रांबरोबरच्या क्षणांना आठवणीचे शब्द दिले.
व्हॉटस् अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम स्टेसवर मित्र-मैत्रिणींचे फोटो झळकत होते. काहींनी व्हिडिओ कॉल तर काहींनी लाईव्हद्वारे एकमेकांशी संवाद साधला. बालपण ते आतापर्यंतच्या आयुष्यातील सर्व मित्रांना यानिमित्ताने शुभेच्छा देण्यात आल्या. लहान मुले आणि ज्येष्ठांनीही आपल्या मित्राशी व्हीडीओ कॉलद्वारे संवाद साधला. मैत्रीदिनाचा हा जोश आणि जल्लोष सायंकाळपर्यंत कायम होता.

जिल्ह्यातील पर्यटनस्थळी शांतता
चंद्रपूर शहरातील जुनोना रोेड, अब्दुल कलाम आझाद गार्डन, रामाळा तलाव, बटर फ्लाय गार्डन, अजयपूर, मूल तालुक्यातील सोमनाथ, सावली तालुक्यातील आसोला मेंढा तलाव, चिमूर तालुक्यातील धबधबा, कोरपना तालुक्यातील अमलनाला आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवक-युवतींची गर्दी असायची. मोठ्या जल्लोषात मैत्रीदिन साजरा करायचे. मोठ्या प्रमाणात पार्टीसुद्वा करायचे मात्र कोरोनामुळे सर्व पर्यटनस्थळ बंद आहेत. तसेच प्रवासबंदीसुद्धा करण्यात आली आहे. त्यामुळे मैत्रीदिन गजबजले असणारे सर्व पर्यटनस्थी यावर्षी शांतता दिसून आली.

Web Title: Golden moments were shared by friends on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.