शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सुट्टीत गावाला जाताय; मग पोलिसांना माहिती द्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 14:38 IST

चंद्रपूर पोलिसांचे आवाहन : कुलूपबंद घरे करतात चोरटे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : दिवाळीला सुरुवात झाली आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्या लागल्या आहेत. दिवाळीच्या सुट्टयांत अनेक जण बाहेरगावी जाण्याचा बेत आखत आहेत. मात्र, दरवर्षीच चोरटे बंद घराला लक्ष्य करीत असल्याचे समोर आले आहे. यासाठी बाहेरगावी जाताना पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दिवाळी हा सण सर्वात मोठा सण आहे. या काळात सर्वच विभागाला सुट्टया असतात. विशेषतः शाळा- महाविद्यालयाला सुट्ट्या असतात. अनेक जण नोकरी, व्यवसाय, मुलांच्या शिक्षणासाठी मूळ गावाऐवजी शहरात राहतात. दिवाळीत बहुतेक जण गावाला येतात. काहीजण राज्यात, परराज्यात किंवा अगदी विदेशात फिरायला जाण्याचा बेत आखतात. परंतु, सुट्टीच्या काळात बाहेरगावी जाताना घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन केले आहे.

सुरक्षेची काळजी घ्याघरात कोणीही नसताना घरातील मौल्यवान वस्तू, पैशांची काळजी घेणेही आवश्यक आहे. म्हणूनच बाहेरगावी जाताना घराला कुलूप व्यवस्थित लावले असावे. सुरक्षेसाठी आवश्यक यंत्रणा असायला हवी, असा सल्ला पोलिसांकडून देण्यात आला आहे.

बाहेरगावी जाण्याआधी असे करावे नियोजन

  • बाहेरगावी जाताना बंद घरात दागिने, पैसे, किमती वस्तू घरात न ठेवता बँक लॉकरमध्ये ठेवा. 
  • शेजाऱ्यांना माहिती द्या. ३ ते ४ घरांनी मिळून एखादा गुरखा नेमावा.
  • बाहेरगावी जात असल्याची माहिती पोलिसांना द्यावी, गस्तीवरील पोलिस कर्मचाऱ्यांचा संपर्क क्रमांक घ्यावा.
  • कॉलनी किंवा परिसरात संशयित आढळल्यास पोलिसांना कळवा. अलार्मसारखी एखादी बेल बसवा. 
  • बंद घराच्या परिसरातील लाइट सुरू ठेवा.

पोलिसांकडून जनजागृती कुलूपबंद घराला चोरटे लक्ष्य करत असल्याचे आजपर्यंतच्या घटनावरून दिसून आले आहे. त्यामुळे चोरी, घरफोडी यासारख्या घटना घडू नयेत, यासाठी नागरिकांनी बाहेरगावी जाताना जवळील पोलिसांना माहिती द्यावी, तसेच शेजाऱ्याला कळवावे. घरी मौल्यवान वस्तू व दागिने ठेवू नये, लॉकरमध्ये ठेवावे, अशी जनजागृती पोलिसांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर