शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८४ हजार शाळांचे जीआयएस मॅपिंग रखडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 11:26 IST

तांत्रिक अडचणींचा फटका : एकाच दिवशी करायचे होते जीआयएस मॅपिंग

परिमल डोहणेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाच्या आदेशानुसार दि. १९ एप्रिल रोजी राज्यभरातील सर्व यू-डायस क्रमांक असलेल्या शाळांचे जीआयएस (भौगोलिक माहिती प्रणाली) मॅपिंग करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मॅपिंग करताना अनेक तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर रखडली आहे. राज्यातील एकूण एक लाख आठ हजार ३०१ शाळांपैकी केवळ २३ हजार ६०५ शाळांचेच मॅपिंग पूर्ण झाले असून, तब्बल ८४,६९६ शाळांचे जीआयएस मॅपिंग अद्याप अपूर्ण आहे.

शालेय भौतिक सुविधा तपासणी अंतर्गत राज्यातील सर्व यू-डायस क्रमांक असलेल्या शाळांचे 'महास्कूल जीआयएस १.०' अॅपद्वारे मॅपिंग दि. १९ एप्रिल रोजी एकाच दिवशी करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले होते. यासाठी दि. १७ एप्रिल रोजी ऑनलाइन बैठक घेऊन सविस्तर सूचना देण्यात आल्या होत्या. या निर्देशानुसार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी केंद्रप्रमुखांमार्फत सर्व मुख्याध्यापकांना मॅपिंगबाबत सूचना दिल्या होत्या. मात्र शनिवारी प्रत्यक्ष अंमलबजावणी दरम्यान राज्यभरातील अनेक शाळांमध्ये अॅपमध्ये अडथळे, सर्व्हर समस्या आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीची अडचण जाणवली. या तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील केवळ २३,६०५ शाळांचेच जीआयएस मॅपिंग पूर्ण झाले असून, उर्वरित ८४,६९६ शाळांचे मॅपिंग रखडले आहे. यामुळे अनेक मुख्याध्यापक संभ्रमात असून, पुढील मॅपिंग कधी व कशा पद्धतीने करायचे, याची स्पष्टता अद्याप शिक्षण विभागाकडून मिळालेली नाही. 

फोटो अपलोड करायचा कसा?जीआयएस मॅपिंग करताना शाळेचा फ्रंट व्हा, जनरल व्हा, किचन शेड, पिण्याचे पाणी, मुला-मुलींचे शौचालय अशा विविध सुविधांचे फोटो, जिओ टॅग करून अपलोड करणे बंधनकारक होते; मात्र अद्यापही राज्यातील अनेक शाळेत या सुविधा नाहीत. त्यामुळे फोटो अपलोड करायचा कसा? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे. 

अशी आहे मॅपिंग रखडलेल्या जिल्ह्यांची स्थितीअकोला १७३९, अमरावती २४०४, भंडारा ८५०, बीड २८६३, बुलढाणा १९१४, चंद्रपूर २१०६, छ. संभाजीनगर ३३४१, धाराशिव १२६२, धुळे १७६५, गडचिरोली १७४९, गोंदिया १२०६, हिंगोली १२०८, जळगाव २७९५, अहमदनगर ३७९७, जालना १८६८, कोल्हापूर २९०९, लातूर २०६७, मुंबई २३०७, मुंबई-११,४२७, नागपूर ३०२२, नंदुरबार १८८९, नाशिक ४८५५, पालघर २६८५, परभणी १७०९, पुणे ५८२१, रायगड २६९०, रत्नागिरी १९५८, सांगली १९०१, सातारा २२३१, सिंधुदुर्ग ९६८, सोलापूर ३३०३, ठाणे ३९७२, वर्धा १०२८, वाशिम १०५३, यवतमाळ २६७५. 

राज्यातील अनेक शिक्षक व मुख्याध्यापकांना अचानक आलेल्या सूचनांमुळे अॅप डाऊनलोड करणे आणि वापरणे अवघड गेले. विशेष म्हणजे 'महा स्कूल जीआयएस १.०' हे अॅप कोणत्याही अधिकृत प्ले स्टोअरवर उपलब्ध नव्हते, त्यामुळे अॅप इंस्टॉल व लॉगिन करताना अडचणी निर्माण झाल्या. अनेक मुख्याध्यापकांच्या यू-डायस प्रोफाइलमध्ये मोबाइल क्रमांक अपडेट नसल्यामुळे ओटीपी (वनटाइम पासवर्ड) येत नव्हता. राज्यभरात एकाच दिवशी, एकाच वेळी शेकडो शिक्षकांनी अॅपचा वापर केल्याने सर्व्हर सतत डाऊन होत होता. अॅप हँग होणे, फोटो अपलोड न होणे, स्थानिक डेटा सेव्ह न होणे अशा तांत्रिक अडचणी वारंवार भासत होत्या.

"दि. १९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील शाळांचे जीआयएस मॅपिंग करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. मॅपिंगदरम्यान अनेक अडचणी आल्या. काही शाळांची मॅपिंग झाली आहे. उर्वरित शाळांचे काय करायचे याबाबत नव्या सूचना आल्यानंतरच कळेल."- अश्विनी सोनवाने शिक्षणाधिकारी (प्राथ.) जि. प. चंद्रपूर

टॅग्स :Educationशिक्षणchandrapur-acचंद्रपूर