शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

लेक लाडकी योजनेअंतर्गत मुलींना मिळणार १ लाख रुपये !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:15 IST

लेक लाडकी योजना : ग्रामीण भागात सुरू आहे घरोघरी जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मुलींच्या जन्मास प्रोत्साहन मिळावे, मुलींचा जन्मदर वाढावा, तीच्या शिक्षणास चालना मिळावी, बालविवाह थांबावे, मुलींचे कुपोषण कमी व्हावे आदी बाबींचा विचार करता, सरकारने लेक लाडकी योजना सुरू केली. याअंतर्गत अंगणवाडीसेविका घरोघरी जनजागृती करीत आहे. आता मुलगी झाल्यास पालकांवरील बोजा कमी करून तिला १८ वर्षे वयापर्यंत १ लाख १ हजार रुपये मिळणार आहेत.

मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील मुलींना लाभ दिला जाणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून जन्मलेल्या मुलींना 'लेक लाडकी' योजनेंतर्गत १ लाख १ हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात शासनस्तरावरून प्रचार व प्रसार केला जात आहे. यासाठी अंगणवाडीसेविका परिश्रम घेत आहेत. 

अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून लेक लाडकी योजनेची जनजागृती केली जात आहे. माहितीसाठी अंगणवाडी केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधावा. 

अंगणवाडी सेविकेकडे करा अर्ज ! या अर्जात वैयक्तिक माहिती, पत्त्याची माहिती, मोबाइल नंबर, अपत्याची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि योजनेच्या कोणत्या टप्प्यातील लाभासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. अर्ज भरून झाला की, अंगणवाडी सेविकेकडून पोहोचपावती घ्यायची आहे

असा मिळणार लाभ? पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर ५ हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, १२वीत गेल्यावर ८ हजार रुपये, १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ मिळणार आहे.

कुटुंब नियोजन प्रमाणपत्र १ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या १ अथवा २ मुलींना त्याच प्रमाणे १ मुलगा व १ मुलगी असल्यास मुलीला या योजनेचा लाभ मिळेल. दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास १ मुलगा किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल.

कोणती लागणार कागदपत्रे ? जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखाच्या उत्पन्नाचा दाखला, लाभार्थीचे आधार कार्ड, पालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची झेराक्स, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, दाखला, आदी कागदपत्रे लागणार आहेत. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरgovernment schemeसरकारी योजना