शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

घोडाझरी तलाव नहराच्या नांदेड, नवरगाव वितरिकेला भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर  मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे  त्यांच्या शेतमालाची प्रचंड नुकसान होत आहे. तलावाच्या नवरगाव  वितरिकेवरही मोठे भगदाड पडले आहे.

राजेश बारसागडेलोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड, नवरगाव या वितरिकांची मागील वर्षीच दुरुस्तीची कामे करण्यात आली. मात्र  वर्ष पूर्ण होत नाही तोच पुन्हा या वितरिकांवर मोठे भगदाड पडले आहे. यामुळे शेकडो शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. या  वितरिकेवरील दोन्ही भगदाड तातडीने बुजविण्यात यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. याबाबतचे निवेदन चंद्रपूर येथे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे.घोडाझरी तलावाच्या मुख्य नहराला लागून असलेल्या नांदेड वितरिकेच्या धामणगाव चक जंगलाच्या मोरीवर  मागील वर्षी पाटबंधारे विभागाने दुरुस्तीचे काम केले होते. वर्षभरातच त्या ठिकाणी मोठे भगदाड पडलेले आहे. पाणी नहराला न जाता धामणगाव चक येथील शेतकऱ्यांच्या शेतात जात आहे. त्यामुळे  त्यांच्या शेतमालाची प्रचंड नुकसान होत आहे. तलावाच्या नवरगाव  वितरिकेवरही मोठे भगदाड पडले आहे. दरम्यान हे दोन्ही भगदाड घोडाझरी तलावाचे पाणी सोडण्याच्या अगोदर बुजविण्यात येऊन त्यांची योग्य ती मजबूत दुरुस्ती करण्यात यावी. नाहीतर पुढे पाणी जाणार नाही, अशी स्थिती आहे. यामुळे पुढील शिवारातील शेतकऱ्यांचे पीक पाण्याविना मरतील. इकडे अतिरिक्त पाणी झाल्यामुळे धामणगाव चकच्या शेतकऱ्यांच्या उभ्या  पिकांची नासाळी होईल. मात्र अशी वेळ शेतकऱ्यांवर येऊ देऊ नये, अशी समस्त शेतकऱ्यांची मागणी आहे. 

घोडाझरी तलावांतर्गत समस्यांचे निरसन करातलावाच्या मुख्य नहराचा तत्काळ उपसा व सफाई  करण्यात यावी. नहराच्या विविध वितरिकांची दुरुस्ती करण्यात यावी. पाण्याअभावी शेतकऱ्यांचे पीक करपण्याच्या मार्गांवर असल्याने तलावाचे पाणी सोडण्यात यावे.

दरवर्षी १५ ऑगस्टला घोडाझरी नहराचे पाणी सोडले जाते. त्या अगोदर पाटबंधारे विभागाकडून वितरिकेची पाहणी केली जाते. पण या वर्षी तसे आढळून आले नाही. शेतकऱ्यांच्यावतीने वारंवार दुरुस्तीबाबत पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना फोनद्वारे माहिती दिल्या जात आहे. मात्र ते प्रतिसाद देत नाही.-होमदेव मेश्राम, माजी भाजपा तालुकाध्यक्ष,वलनी ता. नागभीड 

एकाच वर्षात केलेले नहर  वितरिकेच्या दुरुस्तीचे काम वाहून जाते व तेथे मोठे भगदाड पडते. यावरून ते काम किती दर्जाचे झाले असावे. याची कल्पना येते. या बाबीची चौकशी होऊन संबंधित अभियंता, कंत्राटदार आदी दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. त्वरित भगदाड बुजवावे.            -आनंदराव शेंडे, सामाजिक कार्यकर्ते, गोविंदपूर ता.नागभीड

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प