शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

घोडाझरी पर्यटन स्थळाचा ‘लूक’ बदलला

By admin | Updated: June 3, 2017 00:34 IST

पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणकी कात टाकली आहे.

पर्यटकांची गर्दी : विविध विकास कामे मार्गीघनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पूर्व विदर्भात एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध पावलेल्या घोडाझरीने आणकी कात टाकली आहे. घोडाझरीत अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून या सुधारणा पर्यटकांना भूरळ घालत आहेत. खरोखरच घोडाझरीचा चेहरा मोहराच बदलून गेला आहे.तसेही घोडाझरीचे नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना भूरळ घालणारेच आहे. तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या असल्याने एका बाजूला बांध घालून इंग्रजांनी या तलावाची निर्मिती १९०५ मध्ये केली. तलावाची निर्मिती केली त्यावेळी परिसरातील शेतकऱ्यांना सिंचन उपलब्ध व्हावे, अशी इंग्रजांची कल्पना असावी. पण आता हे तलाव नागभीड-सिंदेवाही या तालुक्यातील हजारो हेक्टर शेतीस सिंचन तर उपलब्ध करून देत आहेच, पण त्याच बरोबर हे तलाव पूर्व विदर्भातील एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आले आहे आणि म्हणूनच वर्षभर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यातील पर्यटक येथे भेट देत असतात. तसेच जिल्ह्यातील शाळांच्या सहलीही येथे येत असतात.सद्यस्थितीत घोडाझरीच्या व्यवस्थापनाने घोडाझरीत आणखी नव्याने अनेक सोयी उपलब्ध केल्या आहेत. यात विविध प्रकारच्या बोटींगचा समावेश आहे. आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. आतापर्यंत नसलेली निवासाची सोय, आकर्षक झाडांची लागवड करण्यात आली आहे. विशाल अशा तलावाच्या आणि त्यासमोरील हिरव्या गर्द वनराईचा बसून मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी गवताच्या झोपड्यांची निर्मिती करण्यात आली आहे. गेस्ट हाऊसचाही जीर्णेोद्धार करण्यात आला आहे.घोडाझरीचे बदललेले हे स्वरूप खरोखर डोळ्यात साठवण्याजोगे आहे. आता तर महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाकडून ‘इको टुरीझम’ म्हणून घोडाझरीचा संपुर्ण जंगल परिसर विकसीत करण्यात येत आहे. वनविभागाचे हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. वनविभागाच्या या इको टुरीझमने पर्यटकांना अनासायास दुग्धशर्करा योगाचा लाभ होणार आहे. येथे एकाच दिवशी जंगलभ्रमंती होणार असून या जंगमभ्रमंतीत जंगली पशुपक्षांचे दर्शन आणि घोडाझरीच्या नैसर्गिक सौंदर्याचे दर्शन पर्यटकांना अनुभवता येणार आहे.घोडाझरी-कोरंबी हे अंतर ७ कि.मी.चे आहे. सध्या हा रस्ता कच्चा आहे. ‘इको टुरीझम’च्या माध्यमातून हा रस्ता विकसित करण्यात आला, तर या ठिकाणी पर्यटकांची संख्या वाढू शकते. कारण हे जंगल घनदाट असून येथे प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि या निमित्ताने घोडाझरी आणि कोरंबीलाही महत्त्व प्राप्त होईल.- केशव खंडातेमाजी उपसरपंच, कोरंबी.