शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मतदारयादी जाहीर लवकर करून घ्या आपल्या नावाची खात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 14:00 IST

कुणी म्हणतात सध्या वेळ नाही : कुणी म्हणताहेत निवडणूक जवळ आल्यानंतर बघू

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हा प्रशासनाने मतदारयादी जाहीर करून दोन आठवडे होत आहेत. ही यादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय व संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आली. मात्र, अनेकांनी यादीकडे ढुंकूनही पाहिले नसल्याची माहिती आहे. याबाबत 'लोकमत'ने गुरुवारी (दि. १९) विचारणा केली असता कुणी म्हणाले, सध्या वेळ नाही, तर कुणी म्हणताहेत नंतर बघू, अशी उत्तरे मिळाली आहेत.

१ जुलै २०२४ च्या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदारयादी ३० ऑगस्ट २०२४ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये जिल्हाधिकारी कार्यालय तसेच https://chanda.nic.in या संकेतस्थळावर बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे मतदारयादीत आपले नाव आहे की नाही, ते लगेच तपासावे, मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाही. निवडणुकीची घोषणा होईपर्यंत नावनोंदणी किंवा नाव वगळणे ही प्रक्रिया सुरू राहते. त्यामुळे नागरिकांनी संबंधित ठिकाणी जाऊन नाव तपासावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले होते. काही नागरिक यादी लावलेल्या स्थळापासून जातात. मात्र, त्याकडे पाहात नसल्याचे उघडकीस आले. 

युवकांनाही यादीचे वावडे

  • जिल्ह्यात १८ ते १९ वयोगटातील युवा मतदारांची संख्या केवळ १० हजार ४८८ ने वाढली. सध्याच्या यादीनुसार जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदा- रसंघ मिळून ३३ हजार ८२५ युवा मतदार आहेत. यामध्ये १८ हजार ८०१ पुरुष, १५ हजार २२ स्त्री आणि २ इतर मतदार यांचा समावेश आहे. 
  • जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता ही संख्या एक लाखांच्या घरात असायला हवी होती. मात्र, युवकांनीही मतदारयादीकडे सध्या तरी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.

अशी करा आपल्या नावाची खात्री

  • आगामी मतदारयादी सर्व मतदान केंद्र, तहसील कार्यालये, उपविभागीय अधिकारी कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय वा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. 
  • यादीत नाव समाविष्ट नसल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा तहसील कार्यालयातील निवडणूक विभागास प्रत्यक्ष भेट देऊन किंवा व्होटर्स हेल्पलाइन अॅप अथवा www.voters.eci.gov.in या वेब पोर्टलद्वारे अर्ज नमुना क्रमांक सहा भरून नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे.
टॅग्स :VotingमतदानElectionनिवडणूक 2024vidhan sabhaविधानसभा