मान्सून आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:56+5:30

जिल्ह्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Get ready to fight the monsoon disaster | मान्सून आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज व्हा

मान्सून आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज व्हा

Next
ठळक मुद्देकुणाल खेमनार : आढावा बैठकीत विभागप्रमुखांना दिले निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मान्सुनच्या आपत्तीशी लढण्यासाठी सज्ज व्हा, यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी मान्सून पूर्व आढावा बैठकीत सर्व विभागप्रमुखांना दिले.
जिल्ह्यातील मान्सून पूर्व आढावा बैठक नियोजन भवनात पार पडली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भुगांवकर, उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा आरोग्य अधिकारी राजकुमार गहलोत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील तसेच जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पाटबंधारे विभागाने विशेष काळजी घ्यावी. पुलांची सुरक्षा मान्सुन पूर्व काळातच तपासून घेण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी दिली. दरम्यान, गोसेखुर्द, इरई आदी धरणामध्ये जास्त प्रमाणात पाणी साठा असतो. परंतु, पुरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी पाणीसाठ्याची व पुरासंबंधित पुर्वसूचना केंद्रीय जल आयोगाने तसेच पाटबंधारे विभागाने संबंधित तहसीलदारांना द्यावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यात पुरपरिस्थिती निर्माण झाली तर पावसाळ्यामध्ये सर्व नागरिकांपर्यंत अन्नधान्य पोचविण्यासाठी पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिली.

पाणी तुंबणार नाही याची काळजी घ्या
जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका नगरपंचायती, नगरपरिषदांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये मान्सून पूर्व नालेसफाई व इतर मान्सुन पूर्व कामे पूर्ण करावी. पावसाच्या दिवसामध्ये कुठेही पाणी तुंबणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

औषधसाठ्याकडेही लक्ष देण्याची सूचना
पशुसंवर्धन विभागाने कोणत्याही जनावरांना रोग पसरू नये यासाठी दक्षता घ्यावी, तसे प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आजारासंबंधित प्रतिबंधात्मक उपाय योजना आरोग्य यंत्रणेने राबवावी. कोणत्याही परिस्थितीत औषधांचा साठा कमी होणार नाही, याकडे लक्ष द्यावे. तसेच पावसाळ्यामध्ये झाडे पडून रस्ते अपघात होण्याची शक्यता असते, ही शक्यता लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिले.

कोरोना जनजागृतीसाठी आढावा सभा
चंद्रपूर : कोरोनाचा सद्यास्थितीतील प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती व प्रभावी प्रसिद्धी अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात बैठक आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सध्या अन्य जिल्ह्यातून राज्यातून नागरिक आपापल्या गावी पोहोचत आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून लॉकडाऊन पाळणाºया नागरिकांना पुढील काळामध्ये कोरोना संदर्भात जागरूक करणे व प्रत्येक घराघरांमध्ये यासंदर्भात माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. त्यासाठी आराखडा तयार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. स्वयंप्रेरणेने विनामूल्य योगदान देणाºया कलाकारांचा अधिकाधिक समावेश करावा, काही क्षेत्रातील नामवंतांनी या समाजपयोगी कार्यात योगदान घेण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. जिल्हा प्रशासन यासोबतच आनंदवन येथील महारोगी सेवा समितीचे सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते. कोरोना आजारासंदर्भात शहरातील व ग्रामीण भागातील आवश्यक ठिकाणी प्रसिद्धी अभियान सक्रियतेने राबविण्याबाबत केंद्र शासनाचे निर्देश आहेत. राज्य शासनाकडून देखील या संदर्भात विविध उपाययोजना सुरू आहे. सोबतच स्थानिक स्तरावर देखील मोठ्या प्रमाणात प्रचार होण्याची आवश्यकता जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी यावेळी व्यक्त केली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजारा, उपविभागीय अधिकारी मनोहर गव्हाळ, जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके, जिल्हा प्रशिक्षण अधिकारी डॉ.प्रिती राजगोपाल, पुजा द्विवेदी, डॉ. शीतल आमटे-करजगी, प्राचार्य डॉ. मृणाल काळे उपस्थित होते.

Web Title: Get ready to fight the monsoon disaster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.