शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

२० कर्तृत्ववानांचा नाभिक प्रेरणा पुरस्कारने गौरव

By admin | Updated: March 28, 2017 00:29 IST

नाभिक समाज आधीच अल्पसंख्यांक असल्याने एकत्रित येण्याची गरज आहे.

संदीपकुमार अपार : समाजातील दरी मिटविण्यासाठी पुढे या चंद्रपूर : नाभिक समाज आधीच अल्पसंख्यांक असल्याने एकत्रित येण्याची गरज आहे. त्यासाठी नोकरदार आणि कारागिर वर्गातील दरी मिटवून सोबत चालण्याची आणि समाजातील सधन घटकाने वंचित घटकांना सोबत करण्याची गरज आहे. या प्रेरणा पुरस्कारातून या कामाला दिशा मिळेल, असे प्रतिपादन कळंब (यवतमाळ) येथील उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी केले.शनिवारी २५ मार्चला स्थानिक श्रमिक पत्रकार भवनाच्या सभागृहात नाभिक प्रेरणा पुरस्कारांचे वितरण पार पडले. त्या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून देवरीचे (जि. गोंदिया) आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जीतेंद्र चौधरी होते. अध्यक्षस्थानी युवा नेते राजेंद्र नागतुरे होते. त्यांच्यासह पाहुणे म्हणून राजुराचे नायब तहसिलदार विजय नक्षीणे, पशवैद्यकीय अधिकारी डॉ. पुरूषोत्तम कडूकर, युवा नेते शशीकांत नक्षिणे, श्री गोपालकृष्ण आणि संत नगाजी महाराज देवस्थान व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष वसंतराव बडवाईक यांच्यासह लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर होते.यावेळी बोलताना आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जीतेंद्र चौधरी म्हणाले, समाजाने आता राजकीय आणि सामाजिक प्रवाहात येण्याची गरज आहे. आपण अन्य समाजाच्या मागे आहोत अथवा आपण नाभिक समाजात जन्माला आलो ही न्यूनगंडाची भावना मनातून दूर करून स्वत:चे स्थान निर्माण करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी अन्य पाहुण्यांचीही समयोचित भाषणे झालीत. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ‘सर्वशाखीय नाभिक स्रेहबंध -२०१७’ या उपवधुवरांच्या स्मरणिकेचे प्रकाशनही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी संत नगाजी महराजांच्या प्रतिमेपुढे दीपप्रज्वलन करून पुजन करण्यात आले. प्रास्ताविकातून गोपालकृष्ण मांडवकर यांनी उपक्रमामागील आयोजनाची भूमिका मांडली. कार्यक्रमाचे संचालन अमोल कडूकर आणि सरोज चांदेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार पे्ररणा पुरस्कार समितीचे सहसंयोजक श्याम राजुरकर यांनी मानले. समारंभाच्या यशस्वीतेसाठी पे्ररणा पुरस्कार समितीचे सहसंयोजक दत्तू कडूकर, भानुमती बडवाईक यांच्यासह ज्योती मांडवकर, रंजना राजुरकर, सतीश मांडवकर, संदेश चल्लीरवार, दिनेश एकवनकर आदींनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी) यांचा झाला गौरव या समारंभात राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या २० समाजबांधवांना शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र, नाभिक प्रेरणा पुरस्काराचे स्मृतिचिन्ह देऊन गौरवान्वित करण्यात आले. क्रीडा क्षेत्र गटात ९९ वर्षे वयाचे ज्येष्ठ नागरिक शिवाजी गुरूजी उपाख्य मारोती रामाजी दैवलकर (क्रीडापटू, योगशिक्षक, मल्ल) यांचा सत्कार करण्यात आला. राजकीय क्षेत्रातून साईनाथ गजानन चौधरी (ग्राम पंचायत सदस्य दुर्गापूर), भीमाजी नारायण वाटकर (ग्राम पंचायत सदस्य माढेळी), ज्योती दीपक नक्षीणे (ग्राम पंचायत सदस्य खुटाळा), ज्योत्सना कवडूजी खोबरकर (नगर पंचायत सदस्य, कोरपना), नरसिंग येनगंदलवार (नगरसेवक, बल्लारपूर), संतोष दत्तूजी जमदाडे (सरपंच, ग्राम पंचायत, भामडेळी), संध्या विठ्ठलराव घुमे (उपसरपंच, ग्राम पंचायत, शेगाव खु.), मंदा मधुकर चौधरी (उपसरपंच, ग्राम पंचायत गोवरी) वर्षा दिलीप कौशिक (जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली) यांचा समावेश होता. शैक्षणिक क्षेत्रातून हरीष चंद्रभान ससनकर (आदर्श राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षक), प्रा. निवृत्ती आत्माराम पिस्तुलकर आर्णी जि. यवतमाळ (शोधप्रबंधक विषय- पश्चिम महाराष्ट्रातील नाभिक व्यावसायिकांचे अर्थशास्त्रीय अध्ययन), राजेंद्र प्रभाकरराव नागतुरे (यशस्वी युवा संस्थाचालक), डॉ. प्रा. यशवंत नारायण घुमे (डॉ ,बाबा आमटे यांच्या जीवनकार्यावरील शोधप्रबंध) यांना सन्मानित करण्यात आले. व्यवसाय क्षेत्रातून सौ. स्वाती आणि रमेश चौधरी या सलून संचालक दाम्पत्याला (संचालक, एचबीके हँडसम सलून) सन्मानित करण्यात आले. या सोबतच ज्येष्ठ केशकर्तनकार या नात्याने महादेवराव यशवंतराव जांभुळकर (८३ वर्षे) आणि वासुदेव तातोबाजी हनुमंते (८२ वर्षे) यांचाही गौरव करण्यात आला. साहित्य क्षेत्र- राजेश देवराव बारसागडे (महाराष्ट्र शासन पुरस्कृत बालकवी, कवितासंग्रह- कोंबडा झाला घड्याळ), सामाजिक क्षेत्र- सुमनताई राम चांदेकर (गुरूदेव सेवा मंडळाच्या ज्येष्ठ प्रचारक) आणि कला क्षेत्रातून टिकू सुरेश दयालवार (बालनृत्यांगणा, वय १५ वर्षे) यांचा गौरव करण्यात आला.