लोकवसाहतीला लागूनच कचरा यार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:28 AM2021-04-10T04:28:05+5:302021-04-10T04:28:05+5:30

फोटो घुग्घुस : ग्रामपंचायतीच्या पावलावर पाऊल टाकत वार्ड क्र. १ नियोजित क्रीडांगणाच्या जागेवर गावातील गोळा करून कचरा टाकत असल्याने ...

Garbage yard adjacent to the settlement | लोकवसाहतीला लागूनच कचरा यार्ड

लोकवसाहतीला लागूनच कचरा यार्ड

Next

फोटो

घुग्घुस : ग्रामपंचायतीच्या पावलावर पाऊल टाकत वार्ड क्र. १ नियोजित क्रीडांगणाच्या जागेवर गावातील गोळा करून कचरा टाकत असल्याने त्यातील प्लास्टिक पिशव्या, खर्राच्या पन्न्यात हवेतून घरात प्रवेश होत आहे. मोकाट गुरांचा तिथे जमघट होत असून, या प्राण्यांच्या पोटात प्लास्टिक जात आहे.

सदर कचरा यार्ड गावाबाहेर हटवा, त्वरित कचऱ्याची विल्हेवाट लावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे तालुका अध्यक्ष सत्यनारायण डकरे यांनी नगर परिषदेचे प्रशासक यांना निवेदनाव्दारे केली.

घुग्घुसच्या मध्यभागी असलेल्या वार्ड क्र. १ अमराही परिसरात नियोजित क्रीडांगणाच्या जागेवर पूर्वी ग्रामपंचायत तर आताची नगर परिषद गावातील कचरा घंटागाडीने गोळा करून त्या ठिकाणी टाकत आहे. त्या कचरा यार्डातील कचरा वाऱ्यामुळे विशेषतः प्लास्टिकच्या पिशव्या घरात येत आहेत. हा त्रास या परिसरातील नागरिकांना अनेक दिवसांपासून सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायतीकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्या जागेवर क्रीडा प्रेमी सराव करणाऱ्यांनी राजकीय पुढाऱ्यांचे लक्ष वेधले असता ग्रेडरने कचरा जमा करून नष्ट केला असला तरी त्या जागेचा वापर आजही नगर परिषद कचरा टाकण्याकरिता करीत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यासोबत मुक्या जनावरांना धोका निर्माण झाला आहे.

सदर जागेवरून लोकवसाहतीपासून दूर कचरा यार्ड हलविण्यात यावा, वर्तमान स्थितीत असलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस मागासवर्गीय सेलचे तालुकाध्यक्ष सत्यनारायण डकरे यांनी नगर परिषदेचे प्रशासक यांना निवेदनाव्दारे केली.

Web Title: Garbage yard adjacent to the settlement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.