शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

कचरा वेचणारा रामलू ‘स्वच्छता दूत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:27 IST

संसर्गजन्य रोग होणाऱ्या विविध घटकांना स्पर्श करुन ते आपली दैनंदिनी सुरु करतात.

ठळक मुद्देप्रेरणादायी उपक्रम : पालिकेकडून कचरा वेचणाऱ्यांचा सत्कार

सचिन सरपटवार ।आॅनलाईन लोकमतभद्रावती : संसर्गजन्य रोग होणाऱ्या विविध घटकांना स्पर्श करुन ते आपली दैनंदिनी सुरु करतात. प्लॅस्टिक, बॉटल्स, भंगार हेच त्यांचे सखेसोबती आणि उदनिर्वाहाचे साधनही. आपल्या कामाच्या वस्तू वेचत कायम उकीरड्यावर दिसणारा रामलू गटावार आज भद्रावती शहरातील स्वच्छता दूत झाला आहे.आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कचरा उचलणाऱ्या किंवा घरोघरी जाऊन तो संकलित करणाऱ्या व्यक्ती स्वच्छतेबाबत अतिशय मोलाची भूमिका वटवित आहेत. ज्या ठिकाणी भटकी कुत्रे, डुकरे, जनावरे सातत्याने वास्तव्य करतात. अशा उकीरड्यावर कचरा वेचणाºया व स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या रामलू गटावार याला भद्रावती नगर परिषदेतर्फे स्वच्छता दूत म्हणून घोषित करण्यात आले असून नुकताच त्याचा सत्कारही करण्यात आला. सुशिक्षित समाज कचरा निर्माण करतो अन् अशिक्षित समाज त्या कचऱ्याचे निर्मूलन करुन सुशिक्षांताना स्वच्छतेचा धडा देतो, असे काहिसे चित्र याप्रसंगी पाहायला मिळाले. साधारणता नट, नट्या, नामांकित व्यक्तींना स्वच्छता दूत करण्यात येते. पण कचरा वेचणाऱ्या रामलुला स्वच्छता दूत बनवून भद्रावती न.प. ने एक आदर्श घडवून आणला आहे. भद्रावती न.प. द्वारे भंगार, कचरा वेचणाऱ्यांचे सर्वेक्षण करुन त्यांना ओळखपत्रे देण्यात आली. शहरातील कचरा उचलणाऱ्या १२ व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. शहरातील प्लॅस्टिक वेचण्याचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले असून त्यांनी जमा केलेले प्लॅस्टिक न.प. विकत घेणार आहे. त्याचे आकारमान कमी करुन मशिनद्वारे बंडल बांधून ठेवण्यात आले आहे. रामलू गटावार, दुर्गा वाघामरे, गणपत घोडमारे, मारोती घोडमारे, मिरा घोडमारे, चरणदास ढोके, बेबी वाघमारे, राम मांजरे, सुरज वाघमारे, सावंत वाघमारे, सविता वाघमारे, राम मंजूळकर ही त्यांची नावे आहेत. पालिकेने त्यांचा सत्कारसोहळा आयोजित करून नवा आदर्शच समोर ठेवला. पहिल्यांदाच कचरा वेचणारे मोठ्या व्यासपिठावर उपस्थित झाले होते. प्रत्येकांचे चेहरे भांबावलेले होते. कुणाच्या हातात १५ दिवसांचे बाळ होते तर कुणाचा पायात साधी चप्पलही नव्हती. एक मुलगा तर पॅन्ट न घातलेलाच दिसून आला. या सर्वांचे मन मात्र अगदी स्वच्छ होते. स्वच्छतेच्या बाबतीत सर्वात आधी आपले मन स्वच्छ करावे, असा संदेशही या सत्कार सोहळ्यातून देण्यात आला. नगर परिषद भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव, प्रा. संजय आसेकर यांच्या हस्ते सर्वांना गौरविण्यात आले.