गांगलवाडी : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा २०१४-१५ अंतर्गत साने गुरुजी स्वच्छ शाळा स्पर्धेत ब्रह्मपुरी तालुकास्तरावर गांगलवाडीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक पटकाविला. गांगलवाडी येथे मंगळवारी आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सरपंच ज्ञानेश्वर भोयर व मुख्याध्यापक घुले यांनी स्विकारला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती नेताजी मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्या भावना इरपते, पंचायत समिती सदस्य लांजेवार, सहायक गटविकास अधिकारी राऊत, विस्तार अधिकारी (पंचायत) बोरकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात पं.स. सभापती नेताजी मेश्राम यांच्या हस्ते पुरस्कार व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन ग्रामविकास अधिकारी भरडे यांनी तर आभार मुख्याध्यापक घुले यांनी मानले. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा सरपंच ज्ञानेश्वर भोयर, उपसरपंच चुमदेव जांभुळकर, ग्राम स्वच्छता अभियानाचे अध्यक्ष संजय भोयर, ग्रा.पं. सदस्या आशा म्हशाखेत्री, मनिषा देशमुख, भारती मेश्राम, शाळा व्यवस्थापक समितीचे सदस्या हिना कन्नाके, साधना उरकुडे, अशोक कोवे, मारोतराव बोरकर, मधुकर चौधरी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
स्वच्छ शाळा स्पर्धेत तालुकास्तरावर गांगलवाडी प्रथम
By admin | Updated: December 25, 2015 00:27 IST