बाबुपेठ (चंद्रपूर) : व्यावसायिकांकडून चाकूच्या धाकावर खंडणी उकळणारी शिखलकऱ्यांची टोळी बुधवारी चंद्रपूर शहर पोलिसांनी जेरबंद केली आहे. संतोषसिंग टाक, सोनुसिंग टाक, बुद्धासिंग टाक, भीमसिंग टाक, चंद्रशेखर पद्मपल्लीवार अशी अटक करण्यात आलेल्या लुटारूंची नावे आहेत. त्यांना २८ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. २२ मार्च रोजी या लुटारूंनी जुनोना चौकातील एका चायनीज सेंटरच्या चालकाला मारहाण करून त्याच्याजवळी सोन्याची अंगठी, घड्याळ व गल्ल्यातील रोख रक्कम लंपास केली होती. दुकानाचीही नासधूस केली होती. बुधवारी पहाटे जुनोना चौक परिसरातील संबंधित वस्तीमध्ये सापळा लुटारूंना जेरबंद केले. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या टोळीने जुनोना चौकात अक्षरश: उच्छाद मांडला होता. या टोळीची व्यावसायिकांमध्ये इतकी दहशत होती की, त्यांच्या विरूद्ध तक्रार करण्यासाठी कोणताही व्यावसायिक पुढे येत नव्हता. (वार्ताहर)
व्यावसायिकांकडून खंडणी उकळणारी टोळी जेरबंद
By admin | Updated: March 27, 2015 00:46 IST