शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

एन.डी. हॉटेलात जुगार; बिल्डरच्या मुलासह नऊ जुगारी ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 11:39 IST

Chandrapur : रामनगर पोलिसांची मोठी कारवाई ; १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : शहरातील मानांकित एन. डी. हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगारावर रविवार दि.१ सप्टेंबर रोजी रात्री रामनगर पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत चंद्रपूरातील एका बड्या बिल्डरच्या मुलासह नऊ जणांवर कारवाई करण्यात आली. आरोपींकडून १० मोबाइल, एक चारचाकी व पाच दुचाकी गाड्या असा एकूण १८ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून पोलिस हॉटेलात चालणाऱ्या जुगारावर पाळत ठेवून असल्याची माहिती आहे.

आरोपींमध्ये राजेंद्र महादेव नाईक वय ६०, रा. छत्रपती नगर चंद्रपूर), लक्ष्मीकांत रामास्वामी कैनकरीवार (६८) रा. सरकारनगर चंद्रपूर, नरेश भगवान मून (५०) मेजरगेट दुर्गापूर, चंद्रपूर, यशवंत हिरामन रत्नपारखी (१०) रा. तुकूम, विलास सदाशिव खडसे (५२) रा. तुकूम, मयूर भाग्यवान गेडाम (३८) रा. संजयनगर, शामराव हिरामन थेमस्कर (६५) रा. बापटनगर, अजय मधुकर वरकड (५४) गुरुद्वारा रोड, चंद्रपूरातील बिल्डरचा मुलगा अंकित गजानन निलावार (२७) यांचा समावेश आहेत. 

रामनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक मधुकर सामलवार व त्यांच्या पथकाने एन.डी. हॉटेलमधील खोली क्रमांक ११४ मध्ये ही कारवाई केली. तिथे ५२ ताशपात्यावर पैशाची बाजी लावून मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात असल्याचे आढळून आले. आरोपीविरुद्ध ४, ५ मुंबई जुगार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या नेतृत्वात उपविभागीय पोलिस अधीक्षक सुधाकर यादव, ठाणेदार आसिफराजा शेख यांच्या नेतृत्वात एपीआय देवाजी नरोटे, पोलिस उपनिरीक्षक दीपेश ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक मधुकर सामलवार यांच्यासह रामनगर पोलिसांनी केली.

पोळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट पोळ्यादिवशी मोठ्या प्रमाणात जुगार भरत असतो. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिस अलर्ट झाले आहेत. दरम्यान, त्यांना माहिती मिळताच शहरातील एन.डी. हॉटेलात धाड टाकून कारवाई केली

काही महिन्यांपासून सुरु होता जुगाराचा खेळचंद्रपूरात एन.डी. हॉटेलचे नाव मोठे आहे. ग्राहकांना उत्तम आणि दर्जेदार सेवा दिली तर ग्राहक स्वतःहून आकर्षित होतात, हॉटेलात जुगार भरतो ही बाब हॉटेल मालकाला माहिती नसेल काय, असा प्रश्न उपस्थित होता आहे. पोलिस सूत्रानुसार मागील काही महिन्यांपासून या हॉटेलात जुगार भरत असल्याची माहिती पोलिसांच्या कानावर होती. अखेर पोलिसांनी कारवाई केल्याचेही समजते 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर