शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस निरीक्षक छत्रपती चिडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 11:32 IST

दारु तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना बुधवारी पोलीस मुख्यालयात शोकाकूल वातावरणात मानवंदना देण्यात आली.

ठळक मुद्देकुटुंबियांनी व गावकऱ्यांनी दिला साश्रू नयनांनी निरोप

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: दारु तस्करांच्या हल्ल्यात शहीद झालेले चंद्रपूरचे पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांना बुधवारी पोलीस मुख्यालयात शोकाकूल वातावरणात मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीतून तीन फेैरी झाडण्यात आल्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर आणि पोलीस दलातील वरिष्ठांनी चिडे यांना पुष्पांजली वाहून श्रद्धांजली अर्पण केली.अशी होती ही घटना

दारूबंदी घोषित केलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८.४५ च्या सुमारास अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांना त्याच वाहनाने चिरडून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.मौशी रस्त्याने पवनी - तोरगाव मार्गे दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ठाणा प्रभारी चिडे यांना मिळताच ते पी एस आय ए.एस. मलकापूरे , संदीप कोवे आणि पितांबर खरकाटे, रामकृष्ण बोधे  यांना सोबत घेऊन मौशीकडे निघाले. दारूची अवैध वाहतूक करणारी गाडी दृष्टीपथात येताच त्यांनी गाडीचा पाठलाग सुरू केला. यादरम्यान मौशीजवळील गोसे खूर्द नहराजवळ समोरून येणाऱ्या ट्रॅक्टरला या गाडीने धडक दिली व दारूची वाहतूक करणारी गाडी थांबली. त्यामुळे पोलिस गाडीतून पाठलाग करणारे पोलिस गाडीतून खाली उतरले व दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीकडे पायी चालू लागले . तेवढयात दारूची वाहतूक करणारी गाडी रिव्हर्स घेवून पोलिसांच्या अंगावर घालण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकाराने पोलिस भांबावले. मात्र तिघे चपळाईने बाजूला झाले. पण प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे यांचे अंगावरून गाडी गेल्याने ते जागीच ठार झाले.

 

टॅग्स :Policeपोलिस